शैक्षणिक माहितीचा स्रोत
सुजीत फलके
सहशिक्षक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटनांद्रावाडी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद

��!...आपले स्वागत आहे शैक्षणिक माहितीच्या स्रोतरूपी माझ्या या ब्लॉगवर...!��


W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools
W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools

Pages

Wednesday, 11 October 2017

विषारी झाड - सरबेरा ओडोलम

विषारी झाड - सरबेरा ओडोलम


*विषारी झाड - सरबेरा ओडोलम*

========================

सरबेरा ओडोलम नावाचं एक झाड आहे. हे दिसायला जेवढं आकर्षक आहे, तेवढच घातक सुद्धा आहे. हे झाड माणसाचा जीव सुद्धा घेऊ शकते. भारतामध्ये व दक्षिण पूर्व आशियात हे झाड दिसून येते. तेथील लोक त्या झाडाला *सुसाईड ट्री* असे म्हणतात. त्या झाडाचा उपयोग जीव घेण्यासाठी केला जातो.

*प्रत्येक आठवड्यात कमीतकमी एक व्यक्ती या झाडामुळे स्वतःचा जीव गमावून बसतो*.



        *संशोधकांच्या मते जगातील इतर विषारी झाडांपेक्षा हे झाड सर्वात जास्त विषारी आहे*. सरबेरा ओडोलमच्या बियांमध्ये सरबेरीन नावाचं तत्व असतं, ते खूप विषारी असतं. हे तत्व जर *आपल्या शरीरात थोड्या प्रमाणात जरी गेल तर त्यामुळे उलटी, डोक दुखणं, छातीत धडधड वाढणं, यासारख्या समस्या लगेच सुरु होतात*. नंतर हृदयावर याचा प्रभाव पडतो व काही तासांतच माणूस मरण पावतो.



        *असं सांगतात की सरबेरा ओडोलमच्या खुणा मिळणं अवघड असतं. हे जर कोणी खाल्ल तर तपासणी करताना हे कळत नाही कि त्या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला आहे.*

प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय... सावधान ?

प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय... सावधान ?


प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय... सावधान ?







    मग हे वाचाच...



फिरायला जाताना किंवा हॉटेलमध्ये आपण बाहेरच पाणी पीत नाही त्याला पर्याय म्हणून आपण सोबत बॉटलमध्ये पाणी घेऊन जात असतो किंवा सोबत पाणी घेऊन नाही गेलो तरी प्लॅस्टिकच्या बॉटल मधून पाणी पीत असतो. प्लॅस्टिक हे शरीर तसेच पर्यावरणासाठी हानिकारक आहे व यावर न्यायालयाने बंदी देखील घातली आहे. पण तरीही आपण सर्रास प्लॅस्टिकचा वापर करतो. पण कधी विचार केला आहे का की प्लॅस्टिक वॉटर बॉटलचं पाणी पिण्यास सुरक्षित आहे का? नाही ना तर मग आज आपण जाणून घेणार आहोत प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणं किती सुरक्षित आहे?



🔸  प्लॅस्टिकची बाटली ही आरोग्यास धोकादायक अशी रसायने बाहेर टाकते. त्यासाठी बाटलीच्या तळाशी असलेल्या विशेष चिन्हांकडे लक्ष द्या, तेथील त्रिकोण हे दर्शवतात की त्या बाटलीला बनविण्यासाठी कुठल्या प्रकारचं प्लॅस्टिक वापरले गेले आणि ती बाटली किती वेळा रीयूज करता येऊ शकते.



🔸  लेबल असलेली बाटली फक्त एका वापरासाठी सुरक्षित असते. सूर्य, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात येताच अशा बाटलीतुन पाण्यामध्ये विषारी द्रव्य सोडली जातात.



🔸  दुसऱ्याने वापरलेल्या बाटलीने पाणी पिणे म्हणजे एखादी अस्वच्छ वस्तू चाटण्या सारखेच किंवा ते त्याहीपेक्षा वाईट असू शकते. कारण पृथ्वीवर जेवढी संख्या माणसांची आहे त्यापेक्षा जास्त जिवाणू एका माणसाच्या तोंडात असतात. त्यामुळे दुसऱ्याने वापरलेल्या बाटलीतून पाणी पिण्यास टाळावे.



🔸  पॉलीथिलीन आणि पॉलीप्रॉपिलीनने बनलेल्या बाटल्या अनेक वापरांसाठी उपयुक्त आहेत. पण जर त्यात नेहमी थंड पाणी साठवून ठेवलं आणि त्यांना नियमितपणे निर्जंतुक करत राहिलं  तरच त्या सुरक्षित असतात.



🔸  तसेच बाटली नेहमी कोमट पाणी, विनेगर किंवा अँटीबॅक्टेरिअल माऊथवॉशने स्वच्छ करावी.









पाण्याच्या बाटलीचा पुनर्वापर करणे, हा मोठा धोका

-----------------------------------------------------------



🔹 मिनरल वॉटर घेतल्यानंतर तुम्ही त्या बाटलीचा पुनर्वापर करत असाल तर ते चुकीचे आहे. कारण प्लॅस्टिक बाटलीतील पिण्याचे पाणी जर शेअर केले तर त्याने बॅक्टेरीआ पसरू शकतात, ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.



🔹 प्लॅस्टिक पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचा पुनर्वापर केला तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. कारण प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये हानिकारक रसायने असतात जे तुमच्या पिण्याच्या पाण्यात मिसळतात.



🔹 मात्र, असं काही नाही की तुम्ही पाण्याचा पुनर्वापर करू शकत नाहीत. फक्त स्वच्छता पाळणे गरजेचे आहे. जर तुम्ही त्याचा पुनर्वापर करणार असाल तर निदान त्या नीट धुवून घ्या.



🔹 शक्यतो बाटल्या गरम पाण्याने धुवा. कोणत्याही प्लॅस्टिकमध्ये बॅक्टेरीआचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अशा प्लॅस्टिकमधून पाणी पिणे हे जास्त हानिकारक असते. अशा बाटल्यांचा धोका वाढल्याने, अनेक देशांनी प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आणली आहे.

बोम्बे ब्लड ग्रूप

बॉम्बे ब्लड ग्रुप




_*बॉम्बे ब्लड ग्रुप!*_

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💉 *_मराठी डॉक्टरने शोधलेला जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट : बॉम्बे ब्लड ग्रुप!_*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖



      _तुम्हाला रक्तगट अर्थात ब्लड ग्रुप्स माहित असतीलच ,तुमच्या म्हणण्याप्रमाणे A, B, Oआणि AB हे ब्लड ग्रुप्स असतील हो की नाही? पण समजा आम्ही म्हणालो की अजून एक ब्लड ग्रुप असतो तर??? काय? आश्चर्य वाटलं ना? अहो, खरंच एकूण पाच ब्लड ग्रुप्स आहेत. पण आपल्याला 5 व्या बद्दल काहीच माहिती नाही, म्हणून हे कुतुहुलाचे भाव चेहऱ्यावर उमटतात. चला तर आज या पाचव्या अज्ञात ब्लड ग्रुप बद्दल जाणून घेऊया!_



➖➖➖➖➖➖

🅾 *बॉम्बे ब्लड ग्रुप*

➖➖➖➖➖➖



      _5 व्या प्रकारच्या ब्लड ग्रुपचे नाव आहे बॉम्बे ब्लड ग्रुप ! याला Oh म्हणून देखील ओळखले जाते. या ब्लड ग्रुपचा शोध 1952 साली Y M Bhende नावाच्या डॉक्टरांनी पूर्वीच्या मुंबई मध्ये अर्थात बॉम्बे मध्ये लावला होता. म्हणून त्याला बॉम्बे हे नाव पडले._



➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌐 *जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖



      _आपण सर्वजण असे समजतो की ओ निगेटिव्ह हा ब्लड ग्रुप सर्वात दुर्मिळ असतो कारण हा ब्लड ग्रुप फारच कमी लोकांमध्ये आढळ जातो. पण तसे नाहीये, कारण ओ निगेटिव्ह पेक्षाही दुर्मिळ ब्लड ग्रुप आहे बॉम्बे ब्लड ग्रुप! हा ब्लड ग्रुप जगाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ 0.0004 % लोक्संख्येमध्येच आढळतो. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर दर दहा लाख लोकांच्या मागे केवळ 4 जण या ब्लड ग्रुपचे सापडतील. या प्रकारच्या ब्लड ग्रुप मध्ये असणारे अँटीजन H हेच या ब्लड ग्रुपच्या दुर्मिळ असण्याचे महत्त्वाचे कारण आहे. हे अँटीजन H अन्य कोणत्याही ब्लड ग्रुप मध्ये आढळत नाही._



➖➖➖➖➖

🌈 *वैशिष्ट्य*

➖➖➖➖➖



      _अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉम्बे ब्लड टाईप असणाऱ्या व्यक्तीचे रक्त इतर ब्लड ग्रुप्समधील व्यक्तीला चालू शकते, परंतु इतरांचे रक्त बॉम्बे ब्लड टाईप असणाऱ्या व्यक्तीला चालत नाही. या व्यक्तींना केवळ बॉम्बे ब्लड टाईप असणाऱ्या व्यक्तीच रक्त देऊ शकतात. हा ब्लड ग्रुप Close Knit Communities मध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. आई वडील दोघांमध्ये Recessive Allele असल्यास हा ब्लड ग्रुप निर्माण होतो. मुंबईच्या अवघ्या 0.01 % लोकसंख्येमध्ये हा ब्लड ग्रुप आहे._



➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 *गरजेच्या वेळेस हे रक्त कुठे मिळेल.*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖



      _जर कोणाचा बॉम्बे ब्लड ग्रुप असेल तर www.bombaybloodgroup.org  या संकेतस्थळावर संपर्क साधावा. म्हणजे भविष्यात तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांना या दुर्मिळ ब्लड ग्रुपची गरज पडली तर ही संस्था तुमच्या मदतीला धावून येईल._

राष्ट्रपती देशाचे पहिले नागरिक मग तुम्ही कितवे?

राष्ट्रपती देशाचे पहिले नागरिक, तुमचा नंबर कोणता


*_राष्ट्रपती देशाचे पहिले नागरिक, तुमचा नंबर कोणता_*





_देशाच्या १४ व्या राष्ट्रपतिपदी विराजमान झाल्यानंतर रामनाथ कोविंद हे भारताचे पहिले नागरिक बनले तर देशाचे दुसरे नागरिक अर्थात उपराष्ट्रपति व्यंकय्या नायडू हे झाले. देशाच्या नागरिकत्वाच्या क्रमानुसार सामान्य नागरिकाचा यात नेमका नंबर कितवा? हे पाहू..._



🔸तिसरा नागरिक :- पंतप्रधान

🔸चौथा नागरिक :- राज्यपाल (स्वत:च्या संबंधित राज्यात)

🔸पाचवा नागरिक :- देशाचे माजी राष्ट्रपती

🔸सहावा नागरिक :- देशाचे सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष

🔸सातवा नागरिक :- केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, राज्यांचे मुख्यमंत्री, निती आयोगचे उपाध्यक्ष, माजी पंतप्रधान, राज्यसभा आणि लोकसभेचा विरोधी पक्ष नेता

🔸आठवा नागरिक :- भारतातील मान्यताप्राप्त राजदूत, मुख्यमंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यपाल (स्वत:च्या राज्याबाहेर)

🔸नववा नागरिक :- सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश

🔸दहावा नागरिक :- राज्यसभेचे उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, लोकसभेचे उपसभापती, निती आयोगातील सदस्य, संरक्षण विभागाशी निगडीत इतर मंत्री

🔸११ वा नागरिक :- अॅटर्नी जनरल, मंत्रिमंडळ सचिव, उप-राज्यपाल (केंद्रशासित प्रदेशांसह)

🔸१२ वा नागरिक :- तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख

🔸१३ वा नागरिक :- असाधारण राजदूत आणि पूर्णाधिकार प्राप्त मंत्री

🔸१४ वा नागरिक :- राज्यांचे चेअरमन आणि राज्य विधानसभेचे सभापती, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश

🔸१५ वा नागरिक :- राज्यांचे मंत्रिमंडळ सदस्य, केंद्र शासित राज्यांचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, केंद्रातील उपमंत्री





🔸१६ वा नागरिक :- लेफ्टनंट जनरल आणि प्रमुख अधिकारी

🔸१७ वा नागरिक :- अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष, अनुसूचित जाती-जमातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश (स्वत:च्या राज्याबाहेर)

🔸१८ वा नागरिक :- कॅबिनेट मंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यांच्या विधानसभेचे सभापती आणि अध्यक्ष (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष, राज्यांचे मंत्री

🔸१९ वा नागरिक :- केंद्रशासित राज्यांचे मुख्य आयुक्त, केंद्रशासित राज्यांचे उपमंत्री, केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष

🔸२० वा नागरिक :- राज्यांच्या विधानसभांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष (स्वत:च्या राज्याबाहेर)

🔸२१ वा नागरिक :- खासदार

🔸२२ वा नागरिक :- राज्यांचे उपमुख्यमंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर)

🔸२३ वा नागरिक :- लष्कराचे कमांडर, व्हाइसचीफ आणि इतर महत्त्वाचे अधिकारी, राज्य सरकारचे मुख्य सचिव, अल्पसंख्याक आयागोचे आयुक्त, अनुसूचित जाती-जमाती आयोगांचे आयुक्त, अल्पसंख्याक आयोगातील सदस्य, राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य

🔸२४ वा नागरिक :- उप राज्यपालांच्या रँकशी समकक्ष अधिकारी

🔸२५ वा नागरिक :- भारत सरकारचे अतिरिक्त सचिव

🔸२६ वा नागरिक :- भारत सरकारचे संयुक्त सचिव, मेजर जनरल रँकशी समस्क रँकचे अधिकारी



_या सर्वांनंतर देशातील *सामान्य* *व्यक्ती* असतो देशाचा *२७* *वा* *नागरिक*

डेटॉल मध्ये नेमक असतय काय?

डेटॉल मध्ये ‘डेटॉल’ नसतंच मुळी!






डेटॉल मध्ये ‘डेटॉल’ नसतंच मुळी!





  शीर्षक वाचून थोडं चक्रावला असाल ना? तुम्ही म्हणालं काहीही सांगू नका. डेटॉल हे आरोग्याच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून आम्ही डेटॉलची सगळी प्रोडक्ट वापरतो आणि तुम्ही म्हणताय की डेटॉल मध्ये ‘डेटॉल’ नसतंच मुळी! अजूनही विश्वास बसत नसेल तर हे सत्य आज जाणून घ्याच.



एक गोष्ट लक्षात घ्या की ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. डेटॉल हा एक ब्रँड आहे, त्यामुळे आपल्याला वाटत की प्रत्येक प्रोडक्ट मध्ये डेटॉल असतंच, पण असं असायलाच हव असही नाही



इथे म्हणायचं हे आहे की डेटॉलच्या कोणत्याच प्रोडक्टमध्ये डेटॉल नसते.







डेटॉल antiseptic liquid जे आपल्या फर्स्ट एड बॉक्स मध्ये असतं ते एक antiseptic solution म्हणून भारतात प्रचंड प्रसिद्ध आहे. (हे आहे मूळ डेटॉल!) आता अजून एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या की, डेटॉल हे काही नैसर्गिक रसायन नाही ते Chloroxylenol या घटकापासून बनते.



खाली दिलेली ही आहे पूर्वीची मूळ डेटॉल antiseptic liquid ची बाटली यात तुम्हाला सर्वात वर active ingredient मध्ये Chloroxylenol चा उल्लेख आढळेल. अशीच एखादी नवीन प्रकारातील डेटॉल antiseptic liquid ची बॉटल उचलून पहिलीत तरी त्यावर तुम्हाला  Chloroxylenol या घटकाचा उल्लेख दिसेल.



हे डेटॉल आपली जखम स्वच्छ करण्यापासून ते या जखमेला निर्जंतुक करण्याचे महत्त्वाचे काम करते. तसेच आपल्या त्वचेला देखील जंतूपासून दूर ठेवण्याचे महत्त्वाचे काम करते. त्यामुळेच डेटॉल वापरलं की आपण सुरक्षित आहोत अशी आपली श्रद्धाचं आहे म्हणा ना!





आता या antiseptic liquid डेटॉलमध्ये डेटॉल (Chloroxylenol ) असतं असं प्रत्येकाला वाटतं आणि त्याला देखील आपण डेटॉल म्हणूनच संबोधतो.



या antiseptic liquid डेटॉलला जसा वास येतो तसाच वास डेटॉल ब्रँडच्या इतर प्रोडक्ट्सना म्हणजेच साबणापासून ते फरशी साफ करायच्या सॅनीटायजर्स पर्यंत प्रत्येक प्रोडक्टला येतो, त्यामुळे असा समज होतो की डेटॉल ब्रँडच्या प्रोडक्टमध्ये डेटॉल आहे आणि हे सर्व प्रोडक्ट शरीराच्या सुरक्षेसाठी काम करतात. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की डेटॉलच्या प्रत्येक प्रोडक्ट मध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश असतो. त्यात तुम्हाला मूळ डेटॉलमधील Chloroxylenol घटकही दिसणार नाही. याचाच अर्थ काय डेटॉल मध्ये ‘डेटॉल’ नसतंचं!





आता तुमच्याही लक्षात आलं असेल की केवळ डेटॉल या नावाचा डेटॉल ब्रँडने किती मोठा फायदा करून घेतला. नाव आणि मूळ डेटॉल सारखा येणारा सुवास सोडला तर मूळ डेटॉल आणि डेटॉल ब्रँडच्या इतर प्रोडक्टमध्ये काहीही समानता नाही. याच नावामुळे आणि वासामुळे डेटॉल अगदी हातोहात विकले जाते. विश्वास बसत नसेल तर डेटॉल ब्रँडचे कोणतेही प्रोडक्ट उचला आणि त्यात कुठे Chloroxylenol या नावाचा उल्लेख दिसतो का ते सांगा.



१०० टक्के खात्रीशीर सांगतो की डेटॉल antiseptic liquid ची बॉटल वगळता कोणत्याही डेटॉल ब्रँडच्या प्रोडक्टवर तुम्हाला  Chloroxylenol या नावाचा उल्लेख दिसणार नाही. ही गोष्ट सिद्ध करेल की डेटॉल मध्ये ‘डेटॉल’ नसतंच.



आता याचा अर्थ असा देखील काढू नये की डेटॉल नसलेल्या या इतर प्रोडक्ट्समध्ये डेटॉल (Chloroxylenol ) नसल्यामुळे ते निरुपयोगाचे आहेत, तुम्ही वापरत असलेले डेटॉल हे खास तुमच्या शरीराच्या सुरक्षेसाठीच बनवले जातात, फक्त ते डेटॉल (Chloroxylenol ) पासून बनलेले असतात हा समज चुकीचा!

भारतात नोटा कशा तयार होतात?

भारतात नोटा कश्या तयार होतात?






🔹भारतात नोटा कश्या तयार होतात?🔹



रुपया शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम शेर शाह सुरीने भारतावर राज्य करीत असताना १५४०-१५४५ च्या कालखंडात केला होता. सध्या भारतासमवेत इतर ८ देशांमधील चलनाला रुपया म्हटले जाते. भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम भारतीय रिजर्व बँकच्या अखत्यारीत येते. भारतात सर्वात पहिली वॉटरमार्क असलेली नोट १८६१ मध्ये छापण्यात आली होती. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त भारतीय नोटांमध्ये इतर १५ भाषांचा वापर केला जातो.



*🔹भारतात नोटा कुठे छापल्या जातात?🔹*



=====



=====





देशात चार नोट प्रेस आणि एक पेपरमिल आहे. देवास (मध्य प्रदेश), नाशिक (महाराष्ट्र), सालबोनी (पश्चिम बंगाल) आणि म्हैसूर (कर्नाटक) या चार ठिकाणी नोटा छापल्या जातात.



देवास येथील नोट प्रेस मध्ये एका वर्षात २६५ कोटी नोटा छापले जातात. इथे २०, ५०, १००, ५०० किंमतीच्या च्या नोटा छापल्या जातात नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारी शाईसुद्धा इथेच बनते.



नाशिक नोट प्रेस मध्ये १९९१ सालापासून इथे १, २, ५, १०, ५०,१०० किंमतीच्या नोटा छापल्या जातात. सुरवातीला इथे ५० आणि १०० च्या नोटा छापल्या जात नव्हत्या.



*🔹भारतात नाणी कुठे बनवली जातात?🔹*



१. मुंबई

२. कोलकत्ता

३. हैदराबाद

४. नोएडा





*🔹नाण्यांच्या चिन्हावरून समजते की ते कुठे बनवले आहेत :🔹*



प्रत्येक नाण्यावर असलेल्या चिन्हावरून समजते की ते नाणं कुठे बनवलं गेलं आहे. नाण्यावर छापलेल्या वर्षाच्या खाली जर स्टारचे चिन्ह असल्यास ते हैदराबादला बनवलं गेलं आहे. जर वर्षाच्या खाली टिंब असेल तर ते नाणं नोएडाला बनवण्यात आलं आहे. वर्षाच्या खाली डायमंड असल्यास ते नाणं मुंबईत बनवलं आहे. कोलकत्ता मध्ये बनवलेल्या नाण्यावर कोणतेच चिन्ह नसते.





*🔹नोटा कोणत्या वस्तूने बनले जातात?🔹*



रिजर्व बँक ऑफ इंडिया नोट बनवण्यासाठी कापसाच्या कागदाचा आणि विशिष्ट प्रकारच्या शाईचा वापर करते. या प्रकारच्या कागदाचे उत्पादन काही प्रमाणात महाराष्ट्रात (सीएनपी) होते, तर मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेश मधील होशंगाबाद मध्ये होते. काही पेपर आयत सुद्धा केले जातात.







*🔹भारतात प्रत्येकवर्षी किती नोटा छापल्या जातात?🔹*



रिजर्व बँकेच्या एका अहवालानुसार भारत प्रत्येकवर्षी २००० कोटी नोटा छापतो .यामधील ४० टक्के खर्च कागद आणि शाई आयात करण्यामध्ये जातो. हा कागद जपान, जर्मनी आणि ब्रिटन सारख्या देशांमधून आयात केला जातो. नोटा किती छापल्या पाहिजेत, याविषयीचा निर्णय घेण्याचा अधिकार भारतीय रिजर्व बँकेला आहे. नाणी किती तयार केली जावीत याचा निर्णय पूर्णतः सरकार घेते.



*🔹नोटा कशा छापल्या जातात?🔹*



विदेशातून आयात होणाऱ्या आणि होशंगाबाद मधून येणाऱ्या पेपरशीटला एका खास मशिन सायमंटन मध्ये टाकले जाते आणि नंतर इंटाब्यू नावाच्या मशीनने त्यावर कलर केले जाते. याप्रकारे नोट तयार होतात. त्यानंतर चांगल्या आणि खराब नोटा वेगळ्या केल्या जातात. एका वेळेस एका शीट मध्ये ३२ ते ४८ नोटा छापण्यात येतात.



*🔹खराब झालेल्या नोटांना कुठे जमा केले जाते?🔹*



नोटा तयार करतानाच त्यांची ‘सेल्फ लाइफ’ (नोटा योग्य प्रकारे बनण्याचा अवधी) ठरवण्यात येते. हा अवधी संपल्यानंतर किंवा सारख्या वापरणे खराब झालेल्या नोटांना रिजर्व बँक परत घेते

मेंदूची साठवन क्षमता नेमकी किती?

मेंदूची साठवण क्षमता नेमकी किती?






मेंदूची साठवण क्षमता नेमकी किती?



  न्यूरोट्रान्समीटर्स, मेंदू, विशाखा शिर्के, सिनॅप्स

आपला मेंदू आपण समजतो त्यापेक्षा निदान दहा पटीने तरी अधिक कार्यक्षम व प्रभावी आहे असा निष्कर्ष अमेरिकेतील संशोधकांनी काढला आहे. मानवी मेंदूची अत्यंत गुंतागुंतीची, संरचना समजून घेण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अद्यापही प्रयत्नरत आहेत. त्यातूनच हा अत्यंत महत्त्वाचा शोध जगासमोर आलाय.



कित्येक निसर्गनिर्मित गोष्टींचा उलगडा करण्यासाठी, या विश्वातील गूढ रहस्य उकलण्यासाठी मानव त्याच्या मेंदूचा वापर करून शतकानुशतके धडपड करत आला आहे. अर्थातच त्याला या प्रयत्नांमध्ये इतर अवयवांचीही साथ मिळालीच; पण सर्वात बहुमोल ठरला तो मेंदूच! काही लाख वर्षापूर्वी आपला मेंदू विकसित झाला, उत्क्रांतीचा सर्वोत्तम टप्पा मानवाने व त्याच्या मेंदूने गाठला म्हणून तर आज कितीतरी क्षेत्रांमध्ये, कामांमध्ये अफाट झेप आपण घेतलेली आहे. मानवी मेंदूची शक्ती, मर्यादा या किती आहेत हे अद्याप आपल्याला ओळखता आलेलं नाही. त्याची मोजमापं आपल्याला माहीत आहेत, मात्र त्याची गहनता आपल्याला माहीत नाही.



मेंदू हा आपल्या शरीरातला सर्वात प्रभावी व नाजूक अवयव. म्हणून तर त्याच्याभोवती डोक्याच्या जाड त्वचेचं व केसांचं आवरण असतं. तुम्ही करत असलेली प्रत्येक गोष्ट ही याच मेंदूकडून नियंत्रित होत असते. म्हणून तर काही कारणाने मेंदूची कार्यक्षमता काही प्रमाणात गमावलेल्या लोकांना परावलंबी जीणं जगावं लागतं. तर असा हा आपला मेंदू, ज्याची आजवर हजारो पद्धतीने शास्त्रीय व वैज्ञानिक चिकित्सा झालेली आहे. तो किती कार्यक्षम असू शकतो याचा पूर्ण पुरावा अजूनही आपल्याकडे नाही. मेंदू वाढत्या वयानुसार विकसित होत जातो व त्याचं हे शिकणं कधीच थांबत नाही. तर अशा या मेंदूत आपण लाखो गोष्टींच आकलन करतो



माणूस वयाची जितकी र्वष जगतो, तितक्या वर्षातल्या सा-या गोष्टी या मेंदूतच तर साठवलेल्या असतात. मग एवढय़ा सगळ्या गोष्टींची साठवणूक व जपणूक देखील एवढासा लहान आपला मेंदू नावाचा अवयव करत असेल तर त्याची माहिती साठवण्याची क्षमता कितीतरी मोठी असली पाहिजे. मेंदूच्या साठवण क्षमतेविषयी शास्त्रज्ञ गेली अनेक र्वष संशोधन करत आहेत. मात्र ही क्षमता किती असेल याच्या अंतिम निष्कर्षापर्यंत ते पोहोचले नव्हते. आता मात्र मेंदूमधील चेतापेशींच्या जाळ्याची गुंतागुंत आणि मेंदूचा आकार यासंबंधी महत्त्वाचं संशोधन करून आपल्या मेंदूची क्षमता ही आपण समजत होतो त्यापेक्षा दहा पटीने जास्त असावी असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. त्यासाठी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील ला जोला येथील साक इन्स्टिटय़ूटच्या संशोधक शास्त्रज्ञांनी उंदराच्या मेंदूतील हिप्पोकॅम्पस भागातील न्यूरॉन्स म्हणजे चेतातंतूंवर काही प्रयोग केले. यात त्यांनी अद्ययावत मायक्रोस्कॉपी व संगणकीय अल्गोरिदमचे सहाय्य घेऊन उंदराच्या मेंदूच्या थ्रिडी इमेजेस तयार केल्या व त्याच्या एकूण संरचनेचा अभ्यास केला.



त्यांच्या प्रयोगात जे आढळलं ते थक्क करणारे निष्कर्ष आहेत. साक इन्स्टिटय़ूटचे प्राध्यापक आणि संशोधक टेरी सेनोस्की यांनी हा अत्यंत क्रांतिकारी शोध असल्याचं म्हटलं आहे. आपला मेंदू हा एक महाकाय यंत्रासारखा आहे. ज्यात हजारो, लाखो प्रक्रिया या बिनबोभाट सुरू असतात. माणसाच्या जन्मापासून हे मेंदू नावाचे यंत्र आपोआपच सुरू होते व मृत्यूपर्यंत ते तसेच सुरू राहते. तुलनेने बाहेरील जगातील कोणत्याही यंत्रापेक्षा लहान असला तरी प्रत्यक्षात मेंदू हेच या निसर्गातील, जगातील अवाढव्य यंत्र आहे. इतक्या गहन प्रक्रिया तिथे सुरू असतात. अर्थातच कोणत्याही क्रिया-प्रक्रियांसाठी माणसाचे विचार व त्याची स्मृती ही आवश्यक असते.



जी बाहेरील ज्ञानातून तयार होत असते. आता देखील तुम्ही हा लेख वाचताना तुमच्या मनात काहीतरी विचार येत असतील व इथे म्हटलेल्या गोष्टींशी संबंधित काही गोष्टी तुम्हाला आठवत असतील. आपले विचार आणि स्मृती हे मेंदूतील विविध रासायनिक व विद्युत पद्धतींवर अवलंबून असतात, त्यांचाच ते परिपाक असतात असं म्हणायला हरकत नाही आणि या प्रक्रियांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात ते न्यूरॉन्स म्हणजे चेतातंतू. जेव्हा दोन चेतातंतूंमध्ये ‘संवाद’ घडतो तेव्हा एखाद्या तारेतून विद्युतप्रवाह जातो, त्याप्रमाणे तेव्हा ती तार स्वरूपी जागा म्हणजे दोन चेतातंतूंमधील सिनॅप्स म्हटली जाते.



हे सिनॅप्स दोन न्यूरॉन्सच्या टोकांना जोडतात. यातील एक असतो अ‍ॅक्सॉन व दुस-या टोकाला डेंड्राईट म्हणतात. न्यूरोट्रान्समीटर्स नामक रसायनं या दोन न्यूरॉन्सच्या टोकांमधून संदेशांची देवाण-घेवाण करतात. ही प्रक्रिया जिथे घडते ती जागा म्हणजे सिनॅप्स. याच सिनॅप्सच्या संबंधी एक अत्यंत महत्त्वाचा शोध आता या संशोधकांनी जाहीर केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही सिनॅप्स म्हणजे दोन न्यूरॉन्सच्या टोकांमधली किती मोठी आहे त्याप्रमाणात तुमच्या मेंदूतील संदेशवहन किती प्रमाणात यशस्वी होतं व त्यावर अवलंबून पुढील स्मृती व विचारांचं निर्माण होणं असतं. असे हजारो न्यूरॉन्स हे हजारो सिनॅप्सेसनी एकमेकांना जोडलेले असतात. या जागा आपल्या स्मृती व विचार निर्माण करण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या ठरतात. या जागांमध्ये बिघाड म्हणजे थोडक्यात आपल्या मेंदूमध्येच बिघाड.



हा झाला संशोधनाचा एक टप्पा. पण पुढील टप्प्यात संशोधकांना अजून आश्चर्यचकित करणारी माहिती मिळाली. उंदराच्या हिप्पोकॅम्पस भागावरती हे संशोधन करण्यात आलं होतं. मानवी मेंदू व उंदराच्या मेंदूमध्ये खूपसं साम्य आहे. म्हणूनच त्यांना प्रयोगात वापरलं जातं. हिप्पोकॅम्पस म्हणजे जिथून स्मृती, भावना आणि मज्जासंस्थेचं नियंत्रण केंद्रीभूत असतं असा भाग. सिनॅप्सचा म्हणजे दोन न्यूरॉन्समधील जागेचा आकार किती आहे यावर तुमच्या मेंदूची साठवण क्षमता किती असू शकते हे अवलंबून असतं. यापूर्वी हे सिनॅप्स काही ठरावीक प्रकारचे असतील अशी शास्त्रज्ञांची समजूत होती. मात्र आता शास्त्रज्ञांच्या मते या जागा २६ विविध प्रकारच्या असू शकतात.



पूर्वी सिनॅप्सना लहान, मध्यम व विशाल एवढय़ाच प्रकारात मोजलं जात होतं. मात्र संशोधनात संशोधकांना असं आढळून आलं की दोन न्यूरॉन्समधून संदेशवहन होताना अनेक वेळा अ‍ॅक्सॉन प्रकारातले न्यूरॉन (जिथून संदेश पाठवला जातो) हे दोन सिनॅप्स तयार करतात म्हणजे एकाच संदेशाची दुसरी प्रतिकृती ही दुस-या सिनॅप्समध्ये साठवली जाते. डुप्लिकेट कॉपी. या दोन सिनॅप्समध्ये जास्तीत जास्त फक्त आठ टक्के फरक असू शकतो. एवढा व इतर काही प्रमाणांमध्ये त्यांच्यात फरक असू शकतो. किंवा ते अगदी मिळतेजुळतेही असू शकतात. मात्र माहिती तीच साठवली जाते. यापूर्वी मेंदूतील मेमरी किंवा स्मृतीकप्पा हा छोटा व मोठय़ा स्मृतीकप्प्यांच्या स्वरूपात एक किंवा दोन बिट्स एवढाच असेल असं मानलं जात होतं. आता मात्र मेंदूतील मेमरी ही चार बिट्स किंवा एक पेटाबाईट इतकी असू शकते असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय.



अत्यंत कमी ऊर्जेचा वापर करून देखील मेंदू इतका कार्यक्षम कसा असू शकतो हे शोधताना संशोधकांच्या हाती हे महत्त्वाचे निष्कर्ष आले आहेत. एक पेटाबाईट म्हणजे जवळपास इंटरनेटइतकी अवाढव्य, जिचा अंदाज अजूनही लावणं शक्य नाही. मात्र सिनॅप्सच्या आकारांची कल्पना आल्यामुळे मेंदूत किती प्रमाणात माहिती साठवली जाऊ शकते याचा अंदाज आता संशोधकांना आला आहे. हा केवळ अंदाजच आहे, कारण अद्याप माहितीपूर्ण निष्कर्ष काढण्यासाठी संशोधकांच्या दृष्टीने अजूनही हिप्पोकॅम्पसमधील सिनॅप्सेसची पुरेशी माहिती त्यांच्या हातात आलेली नाही.



त्यामुळे मेंदूमध्ये नेमकी किती माहिती साठवली जाऊ शकते याचा आपण केवळ अंदाजच लावू शकतो. त्यातही या दोन्ही सिनॅप्सेसचे आकार हे माहितीच्या प्रकारावर अवलंबून असतात, ते बदलूही शकतात. मात्र हे बदल किती प्रमाणात असतील हे कसं ठरतं हे देखील संशोधकांनी आता शोधलंय. त्यांच्या मते लहानशा सिनॅप्सच्या जोडीच्या आकारांमध्ये, क्षमतेमध्ये बदल घडण्यासाठी, एकाची प्रतिकृती बनताना साधारण २० मिनिटात घडणा-या १५०० क्रिया कारणीभूत असतात. तर मोठय़ा सिनॅप्सेसमध्ये हेच प्रमाण एक दोन मिनिटात होणा-या सुमारे १०० क्रिया एवढे असते. याचा अर्थ प्रत्येक दोन ते वीस मिनिटांत आपल्या मेंदूतील दोन न्यूरॉन्सना जोडणारे दोन सिनॅप्स हे त्यांचे आकार बदलत असतात. संदेश ज्या प्रकारचा असेल त्याप्रकारे ते आकार ठरवले जातात.



सिनॅप्सची ही कार्यपद्धती समजून आल्यामुळे केवळ आठवणी व विचार यांच्या तयार होण्यापाठील क्रिया समजली आहे, एवढंच नाही तर मेंदूच्या अनेक भागात होणा-या शिकणं, विकास होणं, इत्यादी प्रक्रियांमध्येही सिनॅप्सची महत्त्वाची भूमिका असू शकते असा होरा तज्ज्ञांनी मांडला आहे. मेंदूमधील एका रचनेचा उलगडा झाल्यामुळे शास्त्रज्ञ व वैज्ञानिकांना संगणकासारख्या काही यंत्रांची आणखी अत्याधुनिक रचना करणं सोपं होणार आहे. हे संशोधन

सोमनाथ मंदिरापासून दक्षिण धृवा पर्यंत पाऊस पडत नाही?

सोमनाथ मंदिरापासून दक्षिण ध्रुवापर्यंत कोठेही जमिनीवर पाऊस पडत नाही.


सोमनाथ मंदिरापासून दक्षिण ध्रुवापर्यंत कोठेही जमिनीवर पाऊस पडत नाही.





सोमनाथ मंदिर गुजरातमध्ये सौराष्ट्र भागात समुद्रकिनारी वेरावळ या गावापासून 5 किलोमीटरवर आहे. इथून दक्षिण ध्रुव 9936 किलोमीटरवर अंतरावर अंटार्क्टिका या बर्फमय प्रदेशात आहे.



सोमनाथपासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषा काढली तर वाटेत कोठेही कोणताही भूखंड नाही; बेट, खंड किंवा उपखंड नाही. त्यामुळे त्या वाटेवर पाऊस पडला तरी तो समुद्रात पडणार किंवा फारतर समुद्रावर पडणार, तो कोठेही जमिनीवर पडणार नाही.

अंटार्क्टिका खंडावर समजा ढग दाटून आले तरी खाली पडताना त्याचा बर्फ होणार म्हणजे बर्फ पडेल पण पाऊस पडणार नाही

शिसपेंसिल

शिसपेन्सिल........ ?






शिसपेन्सिल........ ?



शिसपेन्सिल हा शब्द आपल्या बोलीभाषेतील नेहमीचाच शब्द. खरं तर शिसपेन्सिलमधील शिसं हा शब्द शास्त्रीयदृष्टय़ा चुकीचा आहे. कारण या पेन्सिलीतील कागदावर काळ्या रंगाची रेष उमटवणारा पदार्थ शिसे नसून ग्रॅफाइट आहे. ग्रॅफाइट या ग्रीक शब्दाचा मूळ शब्द ग्राफलीन (लिहिणारा) असा आहे. १४व्या शतकाच्या आधी लिहिण्यासाठी 'शिसे' हा धातू वापरला जायचा. पुढे ग्रॅफाइटचा शोध लागल्यावर लिहिण्यासाठी ग्रॅफाइटचा वापर होऊ लागला पण शिसं हा शब्द तसाच राहिला. ग्रॅफाइट हे रूपांतरित खडकांमध्ये सापडणारं एक खनिज आहे. काही मूलद्रव्य वेगवेगळ्या स्वरूपांत निसर्गात पाहायला मिळतात. ग्रॅफाइट आणि हिरा ही कार्बन या मूलद्रव्याचीच रूपं आहेत. त्यांचे भौतिक गुणधर्म वेगवेगळे आहेत पण रासायनिक गुणधर्म सारखेच आहेत. ग्रॅफाइटचा रंग काळसर राखाडी असतो. ग्रॅफाइटच्या रेणूमध्ये सहा कार्बनचे अणू षटकोनी आकारात विशिष्ट पद्धतीनं जोडलेले असतात.

पेन्सिलींच शिसं तयार करताना विशिष्ट प्रकारची माती व ग्रॅफाइट एकत्र करून दळतात. त्यात थोडंसं पाणी घालून मिश्रण चांगलं मळून घट्ट गोळा करतात. नंतर दंडगोलाकार यंत्रात भरतात. यंत्र दाबल्यावर खालच्या भोकातून ग्रॅफाइटची अखंड कांडी मिळते. ही कांडी पेन्सिलीच्या लांबीएवढी तोडून तुकडे करतात व ते वाळवितात. नंतर ते ८०० ते १२००अंश सेल्सिअस असलेल्या भट्टीत भाजतात. ठिसूळ कांडय़ा नंतर स्निग्ध पदार्थ मेदाम्ले व मेण यांच्या मिश्रणात भिजवतात. जास्तीचं मेण काढण्यासाठी शिशावर रासायनिक क्रिया करतात. लाकडी पेन्सिलमध्ये घालावयाची कांडी साधारण १.८ ते ४.३ मि.मी. जाडीची असते. पेन्सिलवरील इ या अक्षरावरून ब्लॅक(काळ्या) रंगाचं प्रमाण समजतं तर ऌ या अक्षरावरून हार्डनेस (कठीणपणा) समजतं. 7ऌ असं लिहिलेली पेन्सिल 2ऌ असं लिहिलेल्या पेन्सिलीपेक्षा कठीण असते. या पेन्सिलची अक्षरं पुसट आणि बारीक असतात. या पेन्सिलीमध्ये मातीचं प्रमाण जास्त असतं आणि ग्रॅफाईटचं प्रमाण कमी असतं. पेन्सिलचा ठळकपणा 2इ पासून 7इ पर्यंत वाढत जातो.

लौकिक : पिरॅमिडमध्ये मृतदेह कुजत नाही!

लौकिक : पिरॅमिडमध्ये मृतदेह कुजत नाही!: पिरॅमिडमध्ये मृतदेह कुजत नाही! सामान्यपणे मृतदेह जास्त काळ अंत्यसंस्कारावाचून राहिला की तो कुजायला लागतो आणि दरुगधी येऊ लागते. इजिप्तम...

माशी आपले पुढील दोन पाय का घासते?

माशी अनेकदा आपले पुढील दोन पाय एकमेकांवर का घासते ?






माशी अनेकदा आपले पुढील दोन पाय एकमेकांवर का घासते ?

घरातील माशीच्या पायावर अनेक केस असतात. आणि हे केस एक प्रकारचे चिकट द्रव नेहमी सोडत असतात. आणि या चिकट द्रव्यामुळे bacteria आणि इतर micro organisms पायाला चिटकतात. आणि हेच दूर करण्यासाठी, पाय साफ करण्यासाठी माशी आपले पाय एकमेकांवर घासते.

जेव्हाही एकादी माशी आपले पाय असे घासते तेव्हा लाखो जीवाणू तिच्या पायावरून निघून खाली पडतात. आणि म्हणून माशी रोग पसरवण्यात सर्वाधिक पुढे असते.

वकीलांचा ड्रेस काळ अन Docter चा सफेद का?

वकीलांचा कोट काळा, तर डाँक्टरांचा पाढंरा का


वकीलांचा कोट काळा, तर डॉक्टरांचा कोट पांढरा का?



_वकील आणि डॉक्टर दोघांचाही युनिफॉर्म पाहिला तर अगदी परस्परविरोधी असा आहे. वकिलांचा कोट काळा तर डॉक्टरांचा पांढरा यामागे काय लॉजिक असं शकू असतं? माहित नाही ना, चला तर आज जाणून घेऊयात यामागचं नेमकं कारण_



🎀 *_वकिलांचा कोट काळा असण्यामागच कारण_*



🏮 *रंग आणि त्याचे मनावरील परिणाम*



   रंग नेहमीच आपल्या मनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करत असतात. त्यामुळं वकील आणि डॉक्टरांच्या या विशिष्ट वेशभूषेमागेही एक प्रकारचं मनोविज्ञान दडलेलं आहे. काळा रंग उच्चभ्रू दर्जा दर्शवत. हाच काळा रंग निःपक्षपातीपणा आणि अधिकाराचं प्रतिकही समजला जातो. तो न्यायदानाच्या प्रक्रियेत बाह्य प्रभावांना प्रतिकार करण्याची प्रेरणा देतो. त्याचप्रमाणं पांढर्‍या आणि काळ्या रंगाचं मिश्रण हे औपचारिकतेचंही प्रतिक आहेत.



📓 *अ‍ॅडव्होकेट ऍक्ट*



भारतात 1961 च्या अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टनुसार देशातल्या सर्व कोर्टातल्या वकीलांसाठी हा काळा ड्रेसकोड बंधनकारक असून महिला काळ्या कोटसोबत पांढरी साडी नेसू शकतात. त्याचबरोबर पांढरा कॉलर, पांढरा बँडही वकीलांचा वेशभूषेचा भाग आहेत.



👔 *_डॉक्टरांचा कोट पांढरा असण्यामागच कारण_*



🌈 *रंगाचेच लॉजिक*



       तर दुसरीकडं डॉक्टरांच्या पांढर्‍या ड्रेसकोडमागेही रंगाचच लॉजिक आहे. पांढरा रंग हा स्वच्छता, पवित्रता, विश्वास आणि प्रामाणिकपणाचं प्रतिक आहे. म्हणूनच वैद्यकीय पेशासाठी हा रंग अत्यंत महत्वाचा ठरतो. हा रंग आपल्याला एकप्रकारची सकारात्मक उर्जा प्रदान करतो आणि त्यामुळं तणावापासुन मुक्ती मिळते. याच कारणामुळं डॉक्टर तसेच दवाखान्यातील अन्य कर्मचारीही पांढर्‍या रंगाचा ड्रेसकोड वापरतात. बहूतांश लॅबमधले कर्मचारी आणि वैज्ञानिकही याच रंगाचे कपडे वापरतात.

अणुस्पोटा नंतर होत काय?

अणुस्फोटा नंतर मशरूम च्या आकाराचा ढग का बनतो ?









अणुस्फोटा नंतर मशरूम च्या आकाराचा ढग का बनतो ?





अणुस्फोटानंतर खूप मोठ्या प्रमाणत उर्जा बाहेर टाकली जाते. त्यामुळे उष्णता आणि दाब प्रचंड प्रमाणात वाढतो. उर्जा हि X-rays च्या रुपात बाहेर पडते. सभोवातील वातावरण हि उर्जा शोषून घेते आणि त्यामुळे हवेतील विविध वायुंचा, अत्यंत प्रकाशमान असा एक गोळा निर्माण होतो ज्याला fireball म्हणतात.



Fireball अत्यंत वेगाने मोठा होत जातो, आत मधील उष्ण हवेची घनता बाहेरील वातावरणातील हवेपेक्षा कमी असल्याने तो उंच जात राहतो आणि आपल्या सोबत स्फोटामुळे निर्माण झालेला कचरा, धूळ आणि आद्रता यांचा एक ढग निर्माण करत राहतो. हा ढग वातावरणात १० km पर्यंत वर जाऊ शकतो जेथे वातावरणाची खूप स्थिर layer असते, या प्रक्रियेमध्ये तो बराच थंड सुद्धा होतो.

वातावरणातील या layer पर्यंत येताना अनुस्फोटाच्या या गोळ्यात / ढगात विशेष उर्जा शिल्लक राहत नाही त्यामुळे या layer ला तो भेदू शकत नाही. आणि तो आडवा पसरला जातो. खालून येणारी उर्जा सुद्धा त्याला पसरायला भाग पडते आणि याच क्रियेत मशरूम सारखा आकार त्याला प्राप्त होतो.



अणुस्फोटानंतर खूप मोठ्या प्रमाणत उर्जा बाहेर टाकली जाते. त्यामुळे उष्णता आणि दाब प्रचंड प्रमाणात वाढतो. उर्जा हि X-rays च्या रुपात बाहेर पडते. सभोवातील वातावरण हि उर्जा शोषून घेते आणि त्यामुळे हवेतील विविध वायुंचा, अत्यंत प्रकाशमान असा एक गोळा निर्माण होतो ज्याला fireball म्हणतात.



Fireball अत्यंत वेगाने मोठा होत जातो, आत मधील उष्ण हवेची घनता बाहेरील वातावरणातील हवेपेक्षा कमी असल्याने तो उंच जात राहतो आणि आपल्या सोबत स्फोटामुळे निर्माण झालेला कचरा, धूळ आणि आद्रता यांचा एक ढग निर्माण करत राहतो. हा ढग वातावरणात १० km पर्यंत वर जाऊ शकतो जेथे वातावरणाची खूप स्थिर layer असते, या प्रक्रियेमध्ये तो बराच थंड सुद्धा होतो.

वातावरणातील या layer पर्यंत येताना अनुस्फोटाच्या या गोळ्यात / ढगात विशेष उर्जा शिल्लक राहत नाही त्यामुळे या layer ला तो भेदू शकत नाही. आणि तो आडवा पसरला जातो. खालून येणारी उर्जा सुद्धा त्याला पसरायला भाग पडते आणि याच क्रियेत मशरूम सारखा आकार त्याला प्राप्त होतो.

पावसाचे पाणी थेंब थेंब का पडते?

पाऊसाचे पाणी थेंब थेंबच का पडते ?






पाऊसाचे पाणी थेंब थेंबच का पडते ?



ढग हे पाण्याच्या अतिशय लहान कण आणि बर्फाचे स्पटिक यांनी बनतात. पाऊस पडण्यासाठी (पावसाचे थेंब) बनण्यासाठी हे कण अतिशय सूक्ष्म अशी धूळ, bacteria,परागकण यांच्या संपर्कात यावे लागतात. यांच्या संपर्कात आल्यावर पाणी आणि बर्फाचे हे अनेक कण एकत्र येतात व असंख्य असे गोढलेले थेंब तयार होऊन वरील वातावरणातून खाली येऊ लागतात.

ढगात बनलेला हा पावसाचा थेब कितीही मोठा (जास्तीस जास्त २० mm) असला तरी हवाच्या घर्षणामुळे खाली येऊ पर्यंत त्याचे छोट्या छोट्या (५ mm) थेंबात रुपांतर होते.

थोडक्यात पाऊस बनण्याची पहिली क्रिया (सूक्ष्म धूळ, परागकण, bacteria) याच्या भोवती द्रवाचे अनेक कण चिटकून बर्फाचे कण निर्माण होणे आणि खाली पडताना हवेशी होणारी त्यांची टक्कर यामुळे अखंड पाणी पडू शकत नाही थेंब पडतात.

वीज कशी पडते ?

विज कशि पडते






विजविज कशि पडते



खरं तर वीज पडते तेव्हा आपल्याला ती दिसत नाही, हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल. विजा नेहमी कमीत-कमी रोध म्हणजेच विरोध असलेला मार्ग निवडतात. थोडक्यात कोणता मार्ग सोयीचा आहे, याचा अंदाज घेऊनच वीज पडते. विजेचे मार्ग साधारणपणे खालील प्रकारचे असतात.

अ) एका ढगाकडून दुसऱ्या ढगाकडे

ब) एकाच ढगात एका भागातून दुसऱ्या भागाकडे

क) ढगातून हवेकडे

ड) ढगातून जमिनीकडे

इ) अ ते ड यांच्या दोन किंवा अधिक मिश्रणातून बनणाऱ्या विजेच्या शलाका प्रमाणे असतो.

एका सेकंदाच्या दहा हजाराव्या भागामध्ये वीज चमकण्याची प्रक्रिया पूर्ण होते. विजा कोसळतानाची पूर्ण क्रिया वेगाने मुख्यतः पाच उप-क्रियांच्या टप्प्यांत विभागली जाते. त्यातून आपल्याला विजेचा लखलखाट दिसून गडगडाट एेकू येतो.



स्टेप लॅडर



पहिल्या क्रियेत शिडीप्रमाणे अंदाज घेत हवेतल्या विद्युत भारीत (चार्जड्) आयन्सचा मार्ग तयार होतो. याला ‘स्टेप लॅडर’ म्हणजे विजेच्या ‘शिडीच्या पायऱ्या’ असे म्हणतात.



स्ट्रिमर





पहिली क्रिया होतांना विशिष्ट अंतर पूर्ण करेपर्यंत दुसरी क्रिया सुरू होते. जेव्हा ढगाकडून हवेत ‘स्टेप लॅडर’ बनत खाली येऊ लागते तेव्हा जमिनीकडून तशाच प्रकारे ‘आयन्सची श्रंखला’ तयार होऊ लागते. आयन्सच्या या श्रृंखलेला ‘स्ट्रिमर’ म्हणजे विजेसाठीची ‘मार्गिका’ असे म्हणतात.

स्टेप लॅडर व स्ट्रिमरचा ‘शेकहॅंड’

जमिनीकडून वर जाणारी ‘स्ट्रिमर’ तसेच ढगाकडून खाली येत असलेली ‘स्टेप लॅडर’ यांचा ‘शेकहॅंड’ झाला की वीज पडली असे समजावे. ‘स्टेप लॅडर’ व ‘स्ट्रिमर’चा मिलाप होतो तेव्हा ढगाकडून जमिनीकडे विद्युतधारा वाहून नेली जाते.

रिटर्न स्ट्रोक



‘रिटर्न स्ट्रोक’ म्हणजे



 विद्युतधारेचा ‘परतीचा टोला’ होय. ढगात असलेल्या चार्जचे पूर्ण उदासीनीकरण घडण्यासाठीच्या प्रयत्नात ‘रिटर्न स्ट्रोक’मध्ये जमिनीकडून ढगाकडे विद्युतधारा वाहते. वीज पडल्यावर आपल्याला जो लखलखाट दिसतो तो विजेचा परतीचा मार्ग असतो.

डार्ट लॅडर

एकदा वीज पडते तेव्हा एकापेक्षा जास्त ‘रिटर्न स्ट्रोक’देखील पाहायला मिळतात. यांची संख्या अनेकदा ३५ इतकी मोजली गेली आहे. जेव्हा हे अनेक रिटर्न स्ट्रोक हवेबरोबर जागा बदलत सरकतात तेव्हा त्यांना ‘डार्ट लॅडर’ असे म्हटले जाते.

----------------------- कशि पडते



खरं तर वीज पडते तेव्हा आपल्याला ती दिसत नाही, हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल. विजा नेहमी कमीत-कमी रोध म्हणजेच विरोध असलेला मार्ग निवडतात. थोडक्यात कोणता मार्ग सोयीचा आहे, याचा अंदाज घेऊनच वीज पडते. विजेचे मार्ग साधारणपणे खालील प्रकारचे असतात.

अ) एका ढगाकडून दुसऱ्या ढगाकडे

ब) एकाच ढगात एका भागातून दुसऱ्या भागाकडे

क) ढगातून हवेकडे

ड) ढगातून जमिनीकडे

इ) अ ते ड यांच्या दोन किंवा अधिक मिश्रणातून बनणाऱ्या विजेच्या शलाका प्रमाणे असतो.

एका सेकंदाच्या दहा हजाराव्या भागामध्ये वीज चमकण्याची प्रक्रिया पूर्ण होते. विजा कोसळतानाची पूर्ण क्रिया वेगाने मुख्यतः पाच उप-क्रियांच्या टप्प्यांत विभागली जाते. त्यातून आपल्याला विजेचा लखलखाट दिसून गडगडाट एेकू येतो.



स्टेप लॅडर



पहिल्या क्रियेत शिडीप्रमाणे अंदाज घेत हवेतल्या विद्युत भारीत (चार्जड्) आयन्सचा मार्ग तयार होतो. याला ‘स्टेप लॅडर’ म्हणजे विजेच्या ‘शिडीच्या पायऱ्या’ असे म्हणतात.



स्ट्रिमर





पहिली क्रिया होतांना विशिष्ट अंतर पूर्ण करेपर्यंत दुसरी क्रिया सुरू होते. जेव्हा ढगाकडून हवेत ‘स्टेप लॅडर’ बनत खाली येऊ लागते तेव्हा जमिनीकडून तशाच प्रकारे ‘आयन्सची श्रंखला’ तयार होऊ लागते. आयन्सच्या या श्रृंखलेला ‘स्ट्रिमर’ म्हणजे विजेसाठीची ‘मार्गिका’ असे म्हणतात.

स्टेप लॅडर व स्ट्रिमरचा ‘शेकहॅंड’

जमिनीकडून वर जाणारी ‘स्ट्रिमर’ तसेच ढगाकडून खाली येत असलेली ‘स्टेप लॅडर’ यांचा ‘शेकहॅंड’ झाला की वीज पडली असे समजावे. ‘स्टेप लॅडर’ व ‘स्ट्रिमर’चा मिलाप होतो तेव्हा ढगाकडून जमिनीकडे विद्युतधारा वाहून नेली जाते.

रिटर्न स्ट्रोक



‘रिटर्न स्ट्रोक’ म्हणजे



 विद्युतधारेचा ‘परतीचा टोला’ होय. ढगात असलेल्या चार्जचे पूर्ण उदासीनीकरण घडण्यासाठीच्या प्रयत्नात ‘रिटर्न स्ट्रोक’मध्ये जमिनीकडून ढगाकडे विद्युतधारा वाहते. वीज पडल्यावर आपल्याला जो लखलखाट दिसतो तो विजेचा परतीचा मार्ग असतो.

डार्ट लॅडर

एकदा वीज पडते तेव्हा एकापेक्षा जास्त ‘रिटर्न स्ट्रोक’देखील पाहायला मिळतात. यांची संख्या अनेकदा ३५ इतकी मोजली गेली आहे. जेव्हा हे अनेक रिटर्न स्ट्रोक हवेबरोबर जागा बदलत सरकतात तेव्हा त्यांना ‘डार्ट लॅडर’ असे म्हटले जाते.

माझी शाळा फोटो अल्बम

...
DOWNLOAD BOOKS FOR FREE

शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन

परिवर्तनशील शिक्षण

दिवास्वप्न

तोत्तोचान

टीचर

मुले नापास कां होतात?

सहज शिक्षणाची प्रयोगशाळा

पहिला अध्यापक

लिंगभाव समजून घेताना

प्रिय बाई

धोका शाळा

शिक्षणाचे जादुभरे बेट

समरहिल

मुले खेळतात जग मोठं करतात

कोसबाडच्या टेकडीवरून

*YOUR LOCATION*
WHAT DAY & DATE IS TODAY ?