Pages
- गणित कार्यपुस्तिका-इयत्ता १ ली
- विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पुस्तके
- वर्नानात्म्क नोंदी आकारिक मूल्यमापन
- तोंडीकाम इयत्ता १ली ते ८ वी प्रथम सत्र
- मराठी विषयाचे संपूर्ण व्याकरण
- १०१ अनमोल विचार
- इयत्ता ५वी ते ८ वी शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका
- भारतरत्न
- भारतीय शास्त्रज्ञाचे शोध/पुरस्कार/कार्य
- पहिली/दुसरीचे ज्ञानरचनावादी उपक्रम
- जागतिक दिवस
- महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिवस
- सरकारी कर्मचारी सुरक्षा विषयक कायदे
- शिक्षण हक्क कायदा 2009 कलमे
- विद्यार्थी लाभाच्या योजना
- १ ली ते ८ वी प्रकल्प यादी
- मुख्याध्यापकाची कामे
- शालेय अभिलेखे
- सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदी
- दिवाळी अभ्यास इयत्ता १ ली
- गणितातील महत्त्वाची सूत्रे
- सर्व जागतिक दिवस
- जगातील सर्व स्टेडियम
Wednesday, 12 April 2017
प्रगत शाळेचा इतिहास
प्रगत शाळेचा इतिहास
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटनांद्रावाडी या शाळेची स्थापना एका ३० उंबरा
असणाऱ्या मुस्लीम बहुसंख्य वस्तीत १० जून १९६४
मध्ये झाली असून स्थापने पासून तर आज पर्यंत या शाळेने प्रगती केली आहे.सन २०१२ मध्ये
१४ पट असणारी हि शाळा आज २८ पटसंख्ये वर कार्यकरत आहे.तुटपुंज्या परंतु शाळेसाठी समाधानकारक
भौतिक सुविधा येथे आहेत. गावाला ही शाळा आपलीशी वाटते कारण या वस्तीतील अनेक पिढ्या
याच शाळेने दिल्या आहेत. अनेक शिक्षकांच्या अनमोल योगदानातून हे शक्य झाले आहे.
गावकऱ्यांनी वेळोवेळी शाळेच्या प्रगती साठी आपला खारीचा वाटा दिला आहे .वृक्षारोपण,
सार्वजनिक स्वच्छता,पाणी वापर ,आरोग्य अशा अनेक बाबतीत शाळेने केलेल्या सूचनांचे
पालन त्यानी मनापासून केले आहे.या शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.चौरे यांनी
शाळेचा काया पालटच केला.मा.श्री.नेरकर सर यांनी वस्तीत शिक्षणाबाबत जनजागृती करून भौतिक
सुविधांमध्ये वाढ करून शाळेच्या गुणवत्तेकडे लक्ष केंद्रित केले.यात त्यांना शाळेतील श्री.फलके सर या उपक्रमशील शिक्षकाची मोलाची
साथ मिळाली.गुणवत्ता ,तंत्रज्ञान, काम करण्याची हातोटी यामुळे सन २०१५ केंद्रातील प्रथम
१००% प्रगत शाळा होण्याचा मान या शाळेने पटकवला.आजपर्यंत आबादित आहे.उतरोत्तर यात
प्रगतीच होईल यात शंका नाही.’आमचा आदर्श शेतकरी’ हा परिसर अभ्यासावर आधारित प्रकल्प,’चला
वाढवूया संख्याज्ञान’ हा गणितातील उपक्रम तसेच ‘मराठी भाषा सहज विकास’ हा भाषा
विषयातील उपक्रम जिल्हास्तरापर्यंत नावाजले गेले आहेत.या शाळेतील विद्यार्थ्यानी
अनेक वेळा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वाहवा मिळवली आहे.श्री.फलके सर यांचे नवोपक्रम
राज्यस्तरावर नावाजले गेले आहेत.या शाळेने अनेक विद्यार्थ्याना घडवले आहे. यातील बहुतांश
लोक व्यापारी,काही पोलीस,डॉक्टर,व्यावसायिक आहेत.श्री.सत्तार पटेल(CBI औरंगाबाद),श्री. सलीम पटेल(प्रसिद्ध बांधकाम
व्यावसायिक),श्री. आकील पटेल(डॉक्टर), श्री.अलीम पटेल(सोफ्टवेअर इंजीनेयर) असे अनेक
माजी विद्यार्थी आपल्या योगदानातून समाज कार्य करत आहेत.शाळेला याचा सार्थ अभिमान
वाटतो.’ गुणवत्ता पूर्ण शैक्षणीक विकास’ हाच या शाळेचा पुढील संकल्प आहे.
धन्यवाद
मुख्याध्यापक
प्रा.शा.कोटनांद्रावाडी
Subscribe to:
Posts (Atom)
माझी शाळा फोटो अल्बम
...
*YOUR LOCATION* |
---|
!doctype> |
---|