डेटॉल मध्ये ‘डेटॉल’ नसतंच मुळी!
डेटॉल मध्ये ‘डेटॉल’ नसतंच मुळी!
शीर्षक वाचून थोडं चक्रावला असाल ना? तुम्ही म्हणालं काहीही सांगू नका. डेटॉल हे आरोग्याच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून आम्ही डेटॉलची सगळी प्रोडक्ट वापरतो आणि तुम्ही म्हणताय की डेटॉल मध्ये ‘डेटॉल’ नसतंच मुळी! अजूनही विश्वास बसत नसेल तर हे सत्य आज जाणून घ्याच.
एक गोष्ट लक्षात घ्या की ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. डेटॉल हा एक ब्रँड आहे, त्यामुळे आपल्याला वाटत की प्रत्येक प्रोडक्ट मध्ये डेटॉल असतंच, पण असं असायलाच हव असही नाही
इथे म्हणायचं हे आहे की डेटॉलच्या कोणत्याच प्रोडक्टमध्ये डेटॉल नसते.
डेटॉल antiseptic liquid जे आपल्या फर्स्ट एड बॉक्स मध्ये असतं ते एक antiseptic solution म्हणून भारतात प्रचंड प्रसिद्ध आहे. (हे आहे मूळ डेटॉल!) आता अजून एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या की, डेटॉल हे काही नैसर्गिक रसायन नाही ते Chloroxylenol या घटकापासून बनते.
खाली दिलेली ही आहे पूर्वीची मूळ डेटॉल antiseptic liquid ची बाटली यात तुम्हाला सर्वात वर active ingredient मध्ये Chloroxylenol चा उल्लेख आढळेल. अशीच एखादी नवीन प्रकारातील डेटॉल antiseptic liquid ची बॉटल उचलून पहिलीत तरी त्यावर तुम्हाला Chloroxylenol या घटकाचा उल्लेख दिसेल.
हे डेटॉल आपली जखम स्वच्छ करण्यापासून ते या जखमेला निर्जंतुक करण्याचे महत्त्वाचे काम करते. तसेच आपल्या त्वचेला देखील जंतूपासून दूर ठेवण्याचे महत्त्वाचे काम करते. त्यामुळेच डेटॉल वापरलं की आपण सुरक्षित आहोत अशी आपली श्रद्धाचं आहे म्हणा ना!
आता या antiseptic liquid डेटॉलमध्ये डेटॉल (Chloroxylenol ) असतं असं प्रत्येकाला वाटतं आणि त्याला देखील आपण डेटॉल म्हणूनच संबोधतो.
या antiseptic liquid डेटॉलला जसा वास येतो तसाच वास डेटॉल ब्रँडच्या इतर प्रोडक्ट्सना म्हणजेच साबणापासून ते फरशी साफ करायच्या सॅनीटायजर्स पर्यंत प्रत्येक प्रोडक्टला येतो, त्यामुळे असा समज होतो की डेटॉल ब्रँडच्या प्रोडक्टमध्ये डेटॉल आहे आणि हे सर्व प्रोडक्ट शरीराच्या सुरक्षेसाठी काम करतात. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की डेटॉलच्या प्रत्येक प्रोडक्ट मध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश असतो. त्यात तुम्हाला मूळ डेटॉलमधील Chloroxylenol घटकही दिसणार नाही. याचाच अर्थ काय डेटॉल मध्ये ‘डेटॉल’ नसतंचं!
आता तुमच्याही लक्षात आलं असेल की केवळ डेटॉल या नावाचा डेटॉल ब्रँडने किती मोठा फायदा करून घेतला. नाव आणि मूळ डेटॉल सारखा येणारा सुवास सोडला तर मूळ डेटॉल आणि डेटॉल ब्रँडच्या इतर प्रोडक्टमध्ये काहीही समानता नाही. याच नावामुळे आणि वासामुळे डेटॉल अगदी हातोहात विकले जाते. विश्वास बसत नसेल तर डेटॉल ब्रँडचे कोणतेही प्रोडक्ट उचला आणि त्यात कुठे Chloroxylenol या नावाचा उल्लेख दिसतो का ते सांगा.
१०० टक्के खात्रीशीर सांगतो की डेटॉल antiseptic liquid ची बॉटल वगळता कोणत्याही डेटॉल ब्रँडच्या प्रोडक्टवर तुम्हाला Chloroxylenol या नावाचा उल्लेख दिसणार नाही. ही गोष्ट सिद्ध करेल की डेटॉल मध्ये ‘डेटॉल’ नसतंच.
आता याचा अर्थ असा देखील काढू नये की डेटॉल नसलेल्या या इतर प्रोडक्ट्समध्ये डेटॉल (Chloroxylenol ) नसल्यामुळे ते निरुपयोगाचे आहेत, तुम्ही वापरत असलेले डेटॉल हे खास तुमच्या शरीराच्या सुरक्षेसाठीच बनवले जातात, फक्त ते डेटॉल (Chloroxylenol ) पासून बनलेले असतात हा समज चुकीचा!
No comments:
Post a Comment