महत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग
महत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग
1. तांब्याचा उपयोग :
भांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी.
विद्युत विलेपनासाठी व तांब्याचे क्षार तयार करण्याकरिता.
तांब्यापासून तयार करण्यात येणारी संमिश्रे :
संमिश्र - पितळ
धातू व प्रमाण - तांबे (60 ते 90 %) व जस्त (40 ते 10%)
उपयोग - भांडी तयार करण्याकरिता
संमिश्र - ब्राँझ
धातू व प्रमाण - तांबे (81 ते 90%) व कथील (19 ते 10%)
उपयोग - बेअरिंग, जहाजाची बांधणी, पुतळे, नाणी आणि पदके तयार करण्याकरिता
संमिश्र - जर्मन सिल्व्हर
धातू व प्रमाण - तांबे (50%), जस्त (25%) व निकेल (25%)
उपयोग - हे संमिश्र उच्च प्रतीचे विद्युत रोधक आहे, म्हणून त्याचा उपयोग विद्युत रोधक उपकरणे तयार करण्याकरिता केला जातो.
संमिश्र - बेल मेटल
धातू व प्रमाण - तांबे (78%) व कथील (22%)
उपयोग - घंटया, तास तयार करण्याकरिता
संमिश्र - अॅल्युमिनीयम ब्राँझ
उपयोग - तांबे व अॅल्युमिनीयम भांडी तयार करण्याकरिता
संमिश्र - गनमेटल
धातू व प्रमाण - तांबे (88%) कथील (10%) व जस्त (2%)
उपयोग - बंदुका व बॉयलरचे सुटे भाग व जस्त तयार करण्याकरिता
अॅल्युमिनीअमचा उपयोग :
घरातील भांडी, वमानाचे भाग, फोटोफ्रेम तयार करण्याकरिता
चॉकलेट, सिगारेट आदि वस्तूच्या आवरणाकरिता
विद्युत वाहक तारा तयार करण्याकरिता.
रुपेरी रंग तयार करण्याकरिता.
अॅल्युमिनीयमपासुन तयार करण्यात येणारी संमिश्रे :
संमिश्र - ड्युरालयुनिम
धातू - अॅल्युमिनीयम, तांबे, मॅग्नेशियम व मॅगनीज
उपयोग - हवाई वाहने, मोटारीचे साचे आणि आगगाडीचे भाग तयार करण्याकरिता.
संमिश्र - मॅग्नेलियम
धातू - अॅल्युमिनीयम व मॅग्नेशियम
उपयोग - शास्त्रीय तराजूच्या दांडया, घरघुती उपकरणे व हवाई वाहने तयार करण्याकरिता.
संमिश्र - अॅल्युमिनीअम ब्राँझ
धातू - तांबे, अॅल्युमिनीयम, लोखंड व कथील अॅल्युमिनीयम, कोबाल्ट.
संमिश्र - अल्किनो
धातू - अॅल्युमिनीयम, कोबाल्ट व निकेल
उपयोग - विद्युत जनित्राकरिता लागणारे उच्च प्रतीचे चुंबक तयार करण्याकरिता.
जस्ताचे उपयोग :
लोखंड व पोलाद गंजू नये म्हणून त्यावर विलेपन करण्याकरिता.
विद्युत घटामध्ये इलेक्ट्रोड म्हणून उपयोग केला जातो.
धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.
5. पाराचा उपयोग :
हवादाबमापी आणि तापमापीमध्ये पार्याचा उपयोग करतात.
बाष्पदीप तयार करण्याकरिता पार्याचा उपयोग करतात.
आरसे तयार करण्याकरिता केला जातो.
6. सोडीयमचे उपयोग :
सोडीयम बाष्पदीपामध्ये सोडीयमचा उपयोग करतात.
उच्च तापमान दर्शक तापमापीमध्ये त्याचा उपयोग होतो.
7. मॅग्नेशियमचे उपयोग :
क्षणदिप्ती छायाचित्रणामध्ये मॅग्नेशियमचा उपयोग करतात.
शोभेच्या दारूमध्ये.
धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.
धातूची जोडकामे करण्याकरिता थमाईट मिश्रण तयार करण्यासाठी
No comments:
Post a Comment