शैक्षणिक माहितीचा स्रोत
सुजीत फलके
सहशिक्षक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटनांद्रावाडी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद

��!...आपले स्वागत आहे शैक्षणिक माहितीच्या स्रोतरूपी माझ्या या ब्लॉगवर...!��


W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools
W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools

Pages

Thursday, 28 September 2017

दसरा एक नवीन कल्पना

एक चांगला आणि आवश्‍यक उपक्रम पाठवत आहे......

दसरा आणि आपट्याची पाने

दरवर्षी आपण दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून सर्वाना वाटतो. मित्रानो हे लक्ष्यात घेणे जरुरी आहे कि सोने म्हणून ही पाने वाटावी याचा शास्त्रीय आधार नाही.

कोणत्याही पौराणिक कथेत अशी आपट्याची पाने द्यावी असा उल्लेख नाही, किव्वा पानांची देवाण घेवाण केल्याने काही लाभ होतो असेही नाही.

या मुळे झाडाचे मात्र अतोनात नुकसान होत आहे. पाने हि झाडांची फुफुसे आहेत, तसेच पानातून फोटोसिंथसीसद्वारे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन हवेत सोडला जातो व हवेतील विषारी कार्बन डाय ऑक्साईड झाडात शोषून घेतात.

नुकतीच या झाडांना पालवी फुटून, कोवळी पाने तयार झाली आहेत, या पानांचे काम खऱ्या अर्थाने सुरु होणार आहे. हिच पाने या झाडांसाठी अन्न बनविण्याचे एक प्रमुख काम करतात. या सर्व गोष्टींचा विचार करता, या पुढे झाडाची पाने कृपया सोने म्हणून वाटू नका.

लोकांना भेटायला जाऊन हात जोडून नमस्कार करा, व आशीर्वाद द्या व घ्या. जमल्यास सुवासिक फुले भेट द्या व घ्या, कारण बीज तयार होणार नसेल तर फुलाचा झाडाला काही उपयोग होत नाही. जाई, जुई, चमेली, मोगरा, गुलाब, चाफा वगैरे पुष्कळ सुवासिक फुले बाजारात उपलब्ध असतात ज्यांचा झाडाला काहीच उपयोग नसतो. काही लोक म्हणतील, आपट्याची पाने दसऱ्याला वाटणे ही प्रथा सगळीकडे आहे, या लोकांना निक्षून सांगतो, अशी पाने  वाटण्याची प्रथा फक्त महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक म्हणजे बेळगाव, निपाणी येथेच आहे, बाकी संपूर्ण भारतात दसरा उत्स्फूर्तपणे साजरा होतो पण अशी पाने वाटण्याची कुठेही प्रथा नाही.

याची आणखी एक वाईट बाजू सांगतो, हि पाने जनावरे दुसऱ्या दिवशी खात नाहीत, म्हणजे त्या पानांचा मोठया प्रमाणात कचराच होतो. बाजारात सर्वसाधारण असे चित्र दिसते कि विक्रेते भरमसाठ पाने तोडून आणतात, त्यातील आर्धी विकली जातात, उरलेली पाने तिथेच टाकून हे विक्रेते संध्याकाळी पैशाचा गल्ला घेऊन आपल्या घरी निघून जातात. अश्या तर्हेने कळत- नकळत बाजारात कचरा होण्यास आपणच कारणीभूत होतो. नगरपालिकेचे लोक कचरा साफ करत नाहीत म्हणून आपण ओरडतो, मुळात कचरा केलाच नाही, तर साफ करण्याचा विषय तयार होणार नाही, याची आपल्यासारख्या सुजाण, सुसंकृत, शिक्षित, लोकांनी विचार करण्याची व अमलात आणण्याची वेळ आली आहे.

प्रथा बंद करणे कठीण असते, पण कधीतरी तो बदल घडणे जरुरी आहे, चला या दसऱ्यापासूनच त्याची सुरवात करू, व एक आदर्श विचार समाजात घेऊन जाऊ.

माझी शाळा फोटो अल्बम

...
DOWNLOAD BOOKS FOR FREE

शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन

परिवर्तनशील शिक्षण

दिवास्वप्न

तोत्तोचान

टीचर

मुले नापास कां होतात?

सहज शिक्षणाची प्रयोगशाळा

पहिला अध्यापक

लिंगभाव समजून घेताना

प्रिय बाई

धोका शाळा

शिक्षणाचे जादुभरे बेट

समरहिल

मुले खेळतात जग मोठं करतात

कोसबाडच्या टेकडीवरून

*YOUR LOCATION*
WHAT DAY & DATE IS TODAY ?