शैक्षणिक माहितीचा स्रोत
सुजीत फलके
सहशिक्षक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटनांद्रावाडी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद

��!...आपले स्वागत आहे शैक्षणिक माहितीच्या स्रोतरूपी माझ्या या ब्लॉगवर...!��


W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools
W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools

Pages

पदार्थ शुद्धीकरणाच्या पद्धती

पदार्थ शुद्धीकरणाच्या पद्धती


पदार्थ शुद्धीकरणाच्या पद्धती



ज्या पदार्थामध्ये एकच द्रव्य असतो तो पदार्थ शुद्ध स्थितीत असतो. परंतु ज्या पदार्थात एकापेक्षा जास्त पदार्थ मिसळलेले असतात. तो पदार्थ अशुद्ध स्थितीत असतो.



उदा. अशुद्ध पाण्यात पाण्याबरोबर मातीसुद्धा असते. अशा पदार्थाला शुद्ध स्थितीत मिळविण्याकरिता त्यातील इतर घटक वेगळे करणे आवश्यक आहे.



त्या प्रक्रियेला पदार्थ वेगळे करण्याच्या पद्धती म्हणतात. यामध्ये खालील पद्धतीचा समावेश होतो.

1. घनपदार्थ शुद्ध करण्याच्या पद्धती :-

यामध्ये खालील पद्धतीचा वापर केला जातो.



मळणी करणे :- शेतात पीक तयार झाल्यानंतर त्या पिकाची कापणी करतात. पिकातील कणसाचे दाणे वेगळे करण्याकरिता त्याची मळणी केली जाते.



पाखडणे किंवा उफनणे :- मळणी केलेल्या धान्यात दाण्याबरोबर कचराही असतो. धान्यातील हा कचरा उफनणी करून किंवा सुफामध्ये पाखूडन वेगळा केला जातो आणि स्वच्छ धान्य मिळविले जाते.



चाळणे :- अन्नधान्य किंवा खनिजे दळल्यानंतर त्यातील जाड पदार्थ वेगळे करण्याकरिता छिद्राच्या चाळणीव्दारे ते चाळले जातात. त्यामुळे अनावश्यक पदार्थ वेगळे करता येते.





द्रव पदार्थ शुद्धीकरणाच्या

 पद्धती :-





द्रव पदार्थाचे शुद्धीकरणासाठी खालील पद्धतीचा उपयोग केला जातो.



निवळणे :- एखाद्या द्रवातून त्यात मिसळलेले जड व अविद्राव्य पदार्थ वेगळे करून स्वच्छ द्रव मिळविण्याच्या पद्धतीला निवळणे असे म्हणतात.



उदा. गढूळ पाण्यात मातीचे कण मिसळले असता ते काही वेळानंतर तळाशी बसतात आणि शुद्ध पाणी वेगळे होते. काही वेळा पानी शुद्ध करण्याकरिता गढूळ पाण्यात तुरटीचा खडा फिरवितात. त्यामुळे पाण्यातील मातीचे कण जड होतात आणि ते पाण्याच्या पात्राच्या तळाशी जमतात.



शुद्धीकरणाची ही पद्धत फक्त जड आणि अविद्राव्य कण वेगळे करण्याकरिताच उपयोगात आणता येते.



गाळणे :- ज्या पद्धतीने द्रवातील जड व हलके अविद्राव्य कण द्रवातून वेगळे केले जातात, त्या पद्धतीला गाळणे असे म्हणतात.



उदा. निवळले पानी चाळणी किंवा गाळण कागदामधून गाळल्यास पाण्यातील अविद्राव्य कण गाळण कागदात शिल्लक राहतात आणि द्रव्य भांड्यात जमा होतो.



उर्ध्वपातन :- द्रवाला उष्णता दिली असता त्याचे वाफेत रूपांतर होते व वाफा थंड केल्या असता मूळ स्वरुपातील शुद्ध द्रव प्राप्त होता या प्रक्रियेला उर्ध्वपातन प्रक्रिया असे म्हणतात.



उदा. मीठ आणि पाण्याचे संतृप्त द्रावण तयार करून ते तापविल्यास त्या द्रावण्यातील पाण्याची मीठ शिल्लक राहते.



भागश: उर्ध्वपातन :- या पद्धतीमध्ये परस्परामध्ये मिसळणारे आणि भिन्न उत्कलन बिंदु असणारे दोन किंवा अधिक द्रव, उर्ध्वपातन पद्धतीने वेगळे करता येते. त्या पद्धतीला भागश: उर्ध्वपातन असे म्हणतात.



उदा. कच्चा खनिज तेलापसून पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, व डांबर इत्यादि पदार्थ वेगळे करण्याकरिता या पद्धतीचा उपयोग केला जातो

No comments:

Post a Comment

माझी शाळा फोटो अल्बम

...
DOWNLOAD BOOKS FOR FREE

शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन

परिवर्तनशील शिक्षण

दिवास्वप्न

तोत्तोचान

टीचर

मुले नापास कां होतात?

सहज शिक्षणाची प्रयोगशाळा

पहिला अध्यापक

लिंगभाव समजून घेताना

प्रिय बाई

धोका शाळा

शिक्षणाचे जादुभरे बेट

समरहिल

मुले खेळतात जग मोठं करतात

कोसबाडच्या टेकडीवरून

*YOUR LOCATION*
WHAT DAY & DATE IS TODAY ?