वकीलांचा कोट काळा, तर डाँक्टरांचा पाढंरा का
वकीलांचा कोट काळा, तर डॉक्टरांचा कोट पांढरा का?
_वकील आणि डॉक्टर दोघांचाही युनिफॉर्म पाहिला तर अगदी परस्परविरोधी असा आहे. वकिलांचा कोट काळा तर डॉक्टरांचा पांढरा यामागे काय लॉजिक असं शकू असतं? माहित नाही ना, चला तर आज जाणून घेऊयात यामागचं नेमकं कारण_
🎀 *_वकिलांचा कोट काळा असण्यामागच कारण_*
🏮 *रंग आणि त्याचे मनावरील परिणाम*
रंग नेहमीच आपल्या मनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करत असतात. त्यामुळं वकील आणि डॉक्टरांच्या या विशिष्ट वेशभूषेमागेही एक प्रकारचं मनोविज्ञान दडलेलं आहे. काळा रंग उच्चभ्रू दर्जा दर्शवत. हाच काळा रंग निःपक्षपातीपणा आणि अधिकाराचं प्रतिकही समजला जातो. तो न्यायदानाच्या प्रक्रियेत बाह्य प्रभावांना प्रतिकार करण्याची प्रेरणा देतो. त्याचप्रमाणं पांढर्या आणि काळ्या रंगाचं मिश्रण हे औपचारिकतेचंही प्रतिक आहेत.
📓 *अॅडव्होकेट ऍक्ट*
भारतात 1961 च्या अॅडव्होकेट अॅक्टनुसार देशातल्या सर्व कोर्टातल्या वकीलांसाठी हा काळा ड्रेसकोड बंधनकारक असून महिला काळ्या कोटसोबत पांढरी साडी नेसू शकतात. त्याचबरोबर पांढरा कॉलर, पांढरा बँडही वकीलांचा वेशभूषेचा भाग आहेत.
👔 *_डॉक्टरांचा कोट पांढरा असण्यामागच कारण_*
🌈 *रंगाचेच लॉजिक*
तर दुसरीकडं डॉक्टरांच्या पांढर्या ड्रेसकोडमागेही रंगाचच लॉजिक आहे. पांढरा रंग हा स्वच्छता, पवित्रता, विश्वास आणि प्रामाणिकपणाचं प्रतिक आहे. म्हणूनच वैद्यकीय पेशासाठी हा रंग अत्यंत महत्वाचा ठरतो. हा रंग आपल्याला एकप्रकारची सकारात्मक उर्जा प्रदान करतो आणि त्यामुळं तणावापासुन मुक्ती मिळते. याच कारणामुळं डॉक्टर तसेच दवाखान्यातील अन्य कर्मचारीही पांढर्या रंगाचा ड्रेसकोड वापरतात. बहूतांश लॅबमधले कर्मचारी आणि वैज्ञानिकही याच रंगाचे कपडे वापरतात.
No comments:
Post a Comment