प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय... सावधान ?
प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय... सावधान ?
मग हे वाचाच...
फिरायला जाताना किंवा हॉटेलमध्ये आपण बाहेरच पाणी पीत नाही त्याला पर्याय म्हणून आपण सोबत बॉटलमध्ये पाणी घेऊन जात असतो किंवा सोबत पाणी घेऊन नाही गेलो तरी प्लॅस्टिकच्या बॉटल मधून पाणी पीत असतो. प्लॅस्टिक हे शरीर तसेच पर्यावरणासाठी हानिकारक आहे व यावर न्यायालयाने बंदी देखील घातली आहे. पण तरीही आपण सर्रास प्लॅस्टिकचा वापर करतो. पण कधी विचार केला आहे का की प्लॅस्टिक वॉटर बॉटलचं पाणी पिण्यास सुरक्षित आहे का? नाही ना तर मग आज आपण जाणून घेणार आहोत प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणं किती सुरक्षित आहे?
🔸 प्लॅस्टिकची बाटली ही आरोग्यास धोकादायक अशी रसायने बाहेर टाकते. त्यासाठी बाटलीच्या तळाशी असलेल्या विशेष चिन्हांकडे लक्ष द्या, तेथील त्रिकोण हे दर्शवतात की त्या बाटलीला बनविण्यासाठी कुठल्या प्रकारचं प्लॅस्टिक वापरले गेले आणि ती बाटली किती वेळा रीयूज करता येऊ शकते.
🔸 लेबल असलेली बाटली फक्त एका वापरासाठी सुरक्षित असते. सूर्य, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात येताच अशा बाटलीतुन पाण्यामध्ये विषारी द्रव्य सोडली जातात.
🔸 दुसऱ्याने वापरलेल्या बाटलीने पाणी पिणे म्हणजे एखादी अस्वच्छ वस्तू चाटण्या सारखेच किंवा ते त्याहीपेक्षा वाईट असू शकते. कारण पृथ्वीवर जेवढी संख्या माणसांची आहे त्यापेक्षा जास्त जिवाणू एका माणसाच्या तोंडात असतात. त्यामुळे दुसऱ्याने वापरलेल्या बाटलीतून पाणी पिण्यास टाळावे.
🔸 पॉलीथिलीन आणि पॉलीप्रॉपिलीनने बनलेल्या बाटल्या अनेक वापरांसाठी उपयुक्त आहेत. पण जर त्यात नेहमी थंड पाणी साठवून ठेवलं आणि त्यांना नियमितपणे निर्जंतुक करत राहिलं तरच त्या सुरक्षित असतात.
🔸 तसेच बाटली नेहमी कोमट पाणी, विनेगर किंवा अँटीबॅक्टेरिअल माऊथवॉशने स्वच्छ करावी.
पाण्याच्या बाटलीचा पुनर्वापर करणे, हा मोठा धोका
-----------------------------------------------------------
🔹 मिनरल वॉटर घेतल्यानंतर तुम्ही त्या बाटलीचा पुनर्वापर करत असाल तर ते चुकीचे आहे. कारण प्लॅस्टिक बाटलीतील पिण्याचे पाणी जर शेअर केले तर त्याने बॅक्टेरीआ पसरू शकतात, ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
🔹 प्लॅस्टिक पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचा पुनर्वापर केला तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. कारण प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये हानिकारक रसायने असतात जे तुमच्या पिण्याच्या पाण्यात मिसळतात.
🔹 मात्र, असं काही नाही की तुम्ही पाण्याचा पुनर्वापर करू शकत नाहीत. फक्त स्वच्छता पाळणे गरजेचे आहे. जर तुम्ही त्याचा पुनर्वापर करणार असाल तर निदान त्या नीट धुवून घ्या.
🔹 शक्यतो बाटल्या गरम पाण्याने धुवा. कोणत्याही प्लॅस्टिकमध्ये बॅक्टेरीआचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अशा प्लॅस्टिकमधून पाणी पिणे हे जास्त हानिकारक असते. अशा बाटल्यांचा धोका वाढल्याने, अनेक देशांनी प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आणली आहे.
No comments:
Post a Comment