शैक्षणिक माहितीचा स्रोत
सुजीत फलके
सहशिक्षक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटनांद्रावाडी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद

��!...आपले स्वागत आहे शैक्षणिक माहितीच्या स्रोतरूपी माझ्या या ब्लॉगवर...!��


W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools
W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools

Pages

Wednesday, 28 March 2018

नोबेल

शिक्षकांवरील सुंदर कविता. . . .

नोबेल

अंधार गडद होत जाताना
आकाशाचा फळा
चमचम चांदण्यानी जातो भरत.,
तसे शिक्षकाच्या खात्यात
जमा होत जातात विद्यार्थी .

किती तरी
भावी डाॅक्टर, इंजिनियर, व्यापारी,नेते,
पत्रकार व गुंडसुद्धा
अर्ध्या चड्डीत
असतात त्याच्या धाकात
समोर बसलेले....

त्याच्या चष्म्याचा नंबर बदलत जातो हळुहळु तसे,
अनेक चेहरे अस्पष्ट होत जातात.......

मात्र  प्रार्थनेसारखे शांत,कुशाग्र ,
फंडाच्या रकमेसारखे आजारी,
वेतनवाढीसारखी आनंदी , गुणी,
व शाळा तपासणीसारखी उपद्रवी मुले नोंदवली जातात ठळक,
सेवापुस्तकातल्या नोंदीसारखी ....

पुढे मागे भेटत राहातात,
अनोळखी वळणांवरुन
देत राहातात आवाज.
भर गर्दीत ,
समारंभात,
संमेलनात............कुठेही.

"हे माझे सर बरं का !"
"या माझ्या मॅडम बरं का ! "
आपुलकीनं सांगतात सर्वांना....

गच्च भरलेल्या बसमधे
हात धरुन करतात आग्रह
खिडकीपाशी बसण्याचा.

"नमस्कार करते हं !" म्हणत
नव-यालाही लावतात वाकायला.
तेव्हा अधोरेखित होतो त्याचा पेशा......

कसलं गारुड करतो तो पोरांवर ?
अन् स्विकारत राहातो आयूष्यभर......

एखाद्या बुज-या आवाजाला दिलेल्या हिमतीचा....
   
        जनस्थान पुरस्कार !

कविता शिकवतांना फुटलेल्या हुंदक्याची..........

            फेलोशीप !

सुंदर हस्ताक्षरासाठी  दिलेल्या शाबासकीची........

          साहित्य अकादमी !

पाठीवरुन मायेनं हात फिरवल्याबद्दलचे.........      
             
                 ज्ञानपीठ !

अन् फळ्यासमोर चोख भूमिका बजावल्याचे.............

                नोबेल

माझी शाळा फोटो अल्बम

...
DOWNLOAD BOOKS FOR FREE

शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन

परिवर्तनशील शिक्षण

दिवास्वप्न

तोत्तोचान

टीचर

मुले नापास कां होतात?

सहज शिक्षणाची प्रयोगशाळा

पहिला अध्यापक

लिंगभाव समजून घेताना

प्रिय बाई

धोका शाळा

शिक्षणाचे जादुभरे बेट

समरहिल

मुले खेळतात जग मोठं करतात

कोसबाडच्या टेकडीवरून

*YOUR LOCATION*
WHAT DAY & DATE IS TODAY ?