माझा राजहंस
ज्ञानाची भूक तुझी
शिक्षणानेच होईल पुरी
तुझ्या या भुकेसाठी
ज्ञानकण भरविण मी ।। धृ ।।
लाख संकटे येतील पुढे
उंचच उंच डोंगर कडे
याच त्या अवघड वळणातून
सोपा मार्ग दावीन मी ।।१।।
अंधकारमय जग हे खरे
स्पर्धाचे हे युग सारे
विझलेल्या याच दिव्यांतून
ज्ञानज्योत लावीन मी ।।२।।
स्वप्न पहा तू मोठी मोठी
शितीजाच्या हि पलीकडची
तुझ्या या पंखाचा
साज चढवेल मी ।।३।।
जे घडेल ते उत्तम व्हावे
उदात्त उन्नत स्वीकार्य असावे
तुझ्या कार्याला पुरेल
एवढी ज्ञान शिदोरी देईल मी ।। ४।।
कमी कुठे हि तुना पडे
प्रत्येक प्रकाश वाट तुझ्याकडे
याच त्या ज्ञान सागराचा
राजहंस तुला बनविन मी ।।५।।
…………। सुजीतराज ।
ज्ञानाची भूक तुझी
शिक्षणानेच होईल पुरी
तुझ्या या भुकेसाठी
ज्ञानकण भरविण मी ।। धृ ।।
लाख संकटे येतील पुढे
उंचच उंच डोंगर कडे
याच त्या अवघड वळणातून
सोपा मार्ग दावीन मी ।।१।।
अंधकारमय जग हे खरे
स्पर्धाचे हे युग सारे
विझलेल्या याच दिव्यांतून
ज्ञानज्योत लावीन मी ।।२।।
स्वप्न पहा तू मोठी मोठी
शितीजाच्या हि पलीकडची
तुझ्या या पंखाचा
साज चढवेल मी ।।३।।
जे घडेल ते उत्तम व्हावे
उदात्त उन्नत स्वीकार्य असावे
तुझ्या कार्याला पुरेल
एवढी ज्ञान शिदोरी देईल मी ।। ४।।
कमी कुठे हि तुना पडे
प्रत्येक प्रकाश वाट तुझ्याकडे
याच त्या ज्ञान सागराचा
राजहंस तुला बनविन मी ।।५।।
…………। सुजीतराज ।
No comments:
Post a Comment