बॉम्बे ब्लड ग्रुप
_*बॉम्बे ब्लड ग्रुप!*_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💉 *_मराठी डॉक्टरने शोधलेला जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट : बॉम्बे ब्लड ग्रुप!_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_तुम्हाला रक्तगट अर्थात ब्लड ग्रुप्स माहित असतीलच ,तुमच्या म्हणण्याप्रमाणे A, B, Oआणि AB हे ब्लड ग्रुप्स असतील हो की नाही? पण समजा आम्ही म्हणालो की अजून एक ब्लड ग्रुप असतो तर??? काय? आश्चर्य वाटलं ना? अहो, खरंच एकूण पाच ब्लड ग्रुप्स आहेत. पण आपल्याला 5 व्या बद्दल काहीच माहिती नाही, म्हणून हे कुतुहुलाचे भाव चेहऱ्यावर उमटतात. चला तर आज या पाचव्या अज्ञात ब्लड ग्रुप बद्दल जाणून घेऊया!_
➖➖➖➖➖➖
🅾 *बॉम्बे ब्लड ग्रुप*
➖➖➖➖➖➖
_5 व्या प्रकारच्या ब्लड ग्रुपचे नाव आहे बॉम्बे ब्लड ग्रुप ! याला Oh म्हणून देखील ओळखले जाते. या ब्लड ग्रुपचा शोध 1952 साली Y M Bhende नावाच्या डॉक्टरांनी पूर्वीच्या मुंबई मध्ये अर्थात बॉम्बे मध्ये लावला होता. म्हणून त्याला बॉम्बे हे नाव पडले._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌐 *जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_आपण सर्वजण असे समजतो की ओ निगेटिव्ह हा ब्लड ग्रुप सर्वात दुर्मिळ असतो कारण हा ब्लड ग्रुप फारच कमी लोकांमध्ये आढळ जातो. पण तसे नाहीये, कारण ओ निगेटिव्ह पेक्षाही दुर्मिळ ब्लड ग्रुप आहे बॉम्बे ब्लड ग्रुप! हा ब्लड ग्रुप जगाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ 0.0004 % लोक्संख्येमध्येच आढळतो. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर दर दहा लाख लोकांच्या मागे केवळ 4 जण या ब्लड ग्रुपचे सापडतील. या प्रकारच्या ब्लड ग्रुप मध्ये असणारे अँटीजन H हेच या ब्लड ग्रुपच्या दुर्मिळ असण्याचे महत्त्वाचे कारण आहे. हे अँटीजन H अन्य कोणत्याही ब्लड ग्रुप मध्ये आढळत नाही._
➖➖➖➖➖
🌈 *वैशिष्ट्य*
➖➖➖➖➖
_अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉम्बे ब्लड टाईप असणाऱ्या व्यक्तीचे रक्त इतर ब्लड ग्रुप्समधील व्यक्तीला चालू शकते, परंतु इतरांचे रक्त बॉम्बे ब्लड टाईप असणाऱ्या व्यक्तीला चालत नाही. या व्यक्तींना केवळ बॉम्बे ब्लड टाईप असणाऱ्या व्यक्तीच रक्त देऊ शकतात. हा ब्लड ग्रुप Close Knit Communities मध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. आई वडील दोघांमध्ये Recessive Allele असल्यास हा ब्लड ग्रुप निर्माण होतो. मुंबईच्या अवघ्या 0.01 % लोकसंख्येमध्ये हा ब्लड ग्रुप आहे._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 *गरजेच्या वेळेस हे रक्त कुठे मिळेल.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_जर कोणाचा बॉम्बे ब्लड ग्रुप असेल तर www.bombaybloodgroup.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा. म्हणजे भविष्यात तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांना या दुर्मिळ ब्लड ग्रुपची गरज पडली तर ही संस्था तुमच्या मदतीला धावून येईल._
No comments:
Post a Comment