शैक्षणिक माहितीचा स्रोत
सुजीत फलके
सहशिक्षक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटनांद्रावाडी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद

��!...आपले स्वागत आहे शैक्षणिक माहितीच्या स्रोतरूपी माझ्या या ब्लॉगवर...!��


W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools
W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools

Pages

भारतरत्‍न

भारतरत्‍न


भारतरत्‍न







 हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. १९५४ मध्ये तत्कालिन भारत सरकारतर्फे घेण्यात आला २ जानेवारी १९५४ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ देण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर १२ हून अधिक जणांना मरणोपरान्त भारतरत्‍न दिले गेले आहे. २०१४ मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले. २०१५ सालापर्यंत ४१ जणांना ‘भारतरत्‍न’ हा पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत. या पुरस्काराचे वैशिष्ट्ये व तो देण्यासंबंधीचे नियम भारत सरकारच्या राजपत्रात मनूद केले आहेत. २ फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला. भारतरत्न हा शब्द नावाआधी लिहिण्याचा एक किताब म्हणून वापरता येत नाही.



*प्राथमिक वैशिष्ट्ये*



पुरस्कार एका पदकाच्या स्वरूपाचा असेल आणि त्यास ‘भारतरत्न’ संबोधले जाईल.

हे पदक १.३७५ इंच आकाराच्या व्यासाचे असेल आणि दोन्ही बाजूला गोल कडा असतील. पदकाच्या शीर्ष पटलाच्या मध्ये उगवलेला सूर्य असून त्याची किरणे कडेपर्यंत पसरलेली असतील. सूर्यबिंबावर ‘भारतरत्न’ देवनागरी लिपीत कोरलेले असेल. पदकाच्या खालील कडेवर पुष्पमाला कोरलेली असेल. पदकाच्या मागील बाजूवर मधोमध भारताचे राजचिन्ह कोरले जाईल व त्याच्या खालील बाजूच्या कडेवर ‘सत्यमेव जयते’ देवनागरी लिपीमध्ये कोरले जाईल.

हे पदक ०.२५ इंच रूंदिच्या पांढऱ्या रंगाच्या फितीमध्ये बांधून पुरस्कृत व्यक्तीच्या गळ्यात घातले जाईल.

हे पदक राष्ट्रपतींच्या हस्तेच घातले जाईल.

‘भारतरत्न’ पुरस्काराने अलंकृत व्यक्तीचे नाव भारत सरकारच्या राजपत्रात प्रकाशित केले जाईल आणि राष्ट्रपतींच्या निर्देशाधीन रजिस्टरमध्ये नोंदवले जाईल.

एखाद्या व्यक्तीला दिले गेलेले पदक काढून घेणे व त्या व्यक्तीचे नाव रजिस्टरमधून कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असेल. तसेच एकदा काढून घेतलेले पदक पुन्हा त्या व्यक्तीला परत करणे आणि त्याच्या नावाची रजिस्टरमध्ये नोंद करण्याचा आदेश देण्याचा अधिकारही राष्ट्रपतींना राहिल.



जात, व्यावसायिक प्रतिष्ठा, लिंगभेद या कशाचाही परिणाम या पुरस्काराची पात्र व्यक्ती ठरविताना होणार नाही.

प्रत्येक वेळेला रद्द करण्याची व पुनर्नोंदणी करण्याची प्रकिया भारत सरकारच्या राजपत्रात प्रकाशित केली जाईल.

नवीन बदल संपादन करा

राष्ट्रपतींनी दि. ८ जानेवारी १९५५ रोजी राजपत्रातून पदकासंबंधी काही नवीन बदल अधिसूचित केले. त्यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे :



मा. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांच्या मुद्रेसहित पुरस्कार प्रदान केला जाईल. हे पदक पिंपळाच्या पानाच्या आकाराचे असेल. त्याची लांबा २.३१२५ इंच, रुंदी १.८७५ इंच व जाडी ०.१२५ इंचाची राहील. हे पदक काशाचे बनवले जाईल. याच्या दर्शनी बाजूवर ०.६२५ इंच व्यासाच्या सूर्याची प्रतिकृती कोरलेली असेल. मागील बाजूवर राजचिन्ह कोरले जाईल. सूर्य व घेरा प्लॅटियनमचा असेल. अक्षरांवर चांदीचा मुलामा असेल.

२६ जानेवारी १९५७ च्या अधिसूचनेनुसार हे पदक चमकदार काशामध्ये बदलले.



*भारतरत्न विजेत्यांच्या सुविधा*



‘व्हीव्हीआयपी’च्या समकक्ष श्रेणी

संसदेच्या बैठका व सत्रांमध्ये सहभागी होण्याची सवलत.

भारतीय प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन समारंभात सन्माननीय अतिथी.

भारतामध्ये कुठेही जाण्यासाठी प्रथम श्रेणीचे मोफत विमान व रेल्वे प्रवास तिकिट.

पंतप्रधानांच्या वेतनाएवढे किंवा त्याच्या ५०% एवढे निवृत्ती वेतन.

आवश्यकेनुसार ‘झेड’ श्रेणीची सुविधा.

माजी पंतप्रधान, केंद्र सरकारमधील कॅबिनेट स्तराचे मंत्री, लोकसभा व राज्यसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेता, भारतीय योजना आयोगाचे डेप्युटी चेअरमन आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या नंतरच्या सातव्या स्थानाच्या दर्जाचा सन्मान ‘भारतरत्न’ विजेत्या व्यक्तीला दिलेला आहे.



*पुरस्काराचे स्वरूप*





सुरुवातीला हा पुरस्कार म्हणजे ३५ मिमी व्यासाचे एक वर्तुळाकार सुवर्णपदक असावे अशी कल्पना होती. त्यावर एका बाजूवर मधोमध सूर्याची प्रतिमा, त्याच्या वरच्या बाजूला देवनागरी लिपीत ‘भारतरत्‍न’ असे लिहिलेले व सूर्याच्या खालील बाजूस एक फुलांची माळ असावी, असे ठरले होते. पदकाच्या दुसऱ्या बाजूस संबंधित राज्याचे प्रतीकचिन्ह आणि त्या राज्याचे ब्रीदवाक्य (motto) असावा. अशी एक कल्पना पुढे आली होती. पण नंतर वर्षभरात त्यात बदल होत जात २०१५ साली दिले जाणारे स्मृतिचिन्ह पक्के करण्यात आले. या ‘भारतरत्‍न’ पुरस्काराच्या चिन्हाचे स्वरूप म्हणजे पदकावर एका सोनेरी पिंपळपानावर एका बाजूला मधोमध सूर्याची प्रतिमा व तिच्याखाली ‘भारतरत्‍न’ असे शब्द, आणि पाठीमागच्या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह (“चौमुखी सिंहाची प्रतिमा’) अशा प्रकारचे आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही. पण त्यांना Indian order of precedence मध्ये ७वे स्थान स्थान मिळते. (Bharat Ratna recipients rank seventh in the Indian order of precedence, but are constitutionally prohibited from using the award name as a title.)



हा पुरस्कार ज्या व्यक्तींना मिळाला आहे, त्यांच्या नावाआधी भारतरत्‍न हा शब्द उपाधीसारखा वापरायची मुभा नाही.

No comments:

Post a Comment

माझी शाळा फोटो अल्बम

...
DOWNLOAD BOOKS FOR FREE

शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन

परिवर्तनशील शिक्षण

दिवास्वप्न

तोत्तोचान

टीचर

मुले नापास कां होतात?

सहज शिक्षणाची प्रयोगशाळा

पहिला अध्यापक

लिंगभाव समजून घेताना

प्रिय बाई

धोका शाळा

शिक्षणाचे जादुभरे बेट

समरहिल

मुले खेळतात जग मोठं करतात

कोसबाडच्या टेकडीवरून

*YOUR LOCATION*
WHAT DAY & DATE IS TODAY ?