भारतात नोटा कश्या तयार होतात?
🔹भारतात नोटा कश्या तयार होतात?🔹
रुपया शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम शेर शाह सुरीने भारतावर राज्य करीत असताना १५४०-१५४५ च्या कालखंडात केला होता. सध्या भारतासमवेत इतर ८ देशांमधील चलनाला रुपया म्हटले जाते. भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम भारतीय रिजर्व बँकच्या अखत्यारीत येते. भारतात सर्वात पहिली वॉटरमार्क असलेली नोट १८६१ मध्ये छापण्यात आली होती. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त भारतीय नोटांमध्ये इतर १५ भाषांचा वापर केला जातो.
*🔹भारतात नोटा कुठे छापल्या जातात?🔹*
=====
=====
देशात चार नोट प्रेस आणि एक पेपरमिल आहे. देवास (मध्य प्रदेश), नाशिक (महाराष्ट्र), सालबोनी (पश्चिम बंगाल) आणि म्हैसूर (कर्नाटक) या चार ठिकाणी नोटा छापल्या जातात.
देवास येथील नोट प्रेस मध्ये एका वर्षात २६५ कोटी नोटा छापले जातात. इथे २०, ५०, १००, ५०० किंमतीच्या च्या नोटा छापल्या जातात नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारी शाईसुद्धा इथेच बनते.
नाशिक नोट प्रेस मध्ये १९९१ सालापासून इथे १, २, ५, १०, ५०,१०० किंमतीच्या नोटा छापल्या जातात. सुरवातीला इथे ५० आणि १०० च्या नोटा छापल्या जात नव्हत्या.
*🔹भारतात नाणी कुठे बनवली जातात?🔹*
१. मुंबई
२. कोलकत्ता
३. हैदराबाद
४. नोएडा
*🔹नाण्यांच्या चिन्हावरून समजते की ते कुठे बनवले आहेत :🔹*
प्रत्येक नाण्यावर असलेल्या चिन्हावरून समजते की ते नाणं कुठे बनवलं गेलं आहे. नाण्यावर छापलेल्या वर्षाच्या खाली जर स्टारचे चिन्ह असल्यास ते हैदराबादला बनवलं गेलं आहे. जर वर्षाच्या खाली टिंब असेल तर ते नाणं नोएडाला बनवण्यात आलं आहे. वर्षाच्या खाली डायमंड असल्यास ते नाणं मुंबईत बनवलं आहे. कोलकत्ता मध्ये बनवलेल्या नाण्यावर कोणतेच चिन्ह नसते.
*🔹नोटा कोणत्या वस्तूने बनले जातात?🔹*
रिजर्व बँक ऑफ इंडिया नोट बनवण्यासाठी कापसाच्या कागदाचा आणि विशिष्ट प्रकारच्या शाईचा वापर करते. या प्रकारच्या कागदाचे उत्पादन काही प्रमाणात महाराष्ट्रात (सीएनपी) होते, तर मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेश मधील होशंगाबाद मध्ये होते. काही पेपर आयत सुद्धा केले जातात.
*🔹भारतात प्रत्येकवर्षी किती नोटा छापल्या जातात?🔹*
रिजर्व बँकेच्या एका अहवालानुसार भारत प्रत्येकवर्षी २००० कोटी नोटा छापतो .यामधील ४० टक्के खर्च कागद आणि शाई आयात करण्यामध्ये जातो. हा कागद जपान, जर्मनी आणि ब्रिटन सारख्या देशांमधून आयात केला जातो. नोटा किती छापल्या पाहिजेत, याविषयीचा निर्णय घेण्याचा अधिकार भारतीय रिजर्व बँकेला आहे. नाणी किती तयार केली जावीत याचा निर्णय पूर्णतः सरकार घेते.
*🔹नोटा कशा छापल्या जातात?🔹*
विदेशातून आयात होणाऱ्या आणि होशंगाबाद मधून येणाऱ्या पेपरशीटला एका खास मशिन सायमंटन मध्ये टाकले जाते आणि नंतर इंटाब्यू नावाच्या मशीनने त्यावर कलर केले जाते. याप्रकारे नोट तयार होतात. त्यानंतर चांगल्या आणि खराब नोटा वेगळ्या केल्या जातात. एका वेळेस एका शीट मध्ये ३२ ते ४८ नोटा छापण्यात येतात.
*🔹खराब झालेल्या नोटांना कुठे जमा केले जाते?🔹*
नोटा तयार करतानाच त्यांची ‘सेल्फ लाइफ’ (नोटा योग्य प्रकारे बनण्याचा अवधी) ठरवण्यात येते. हा अवधी संपल्यानंतर किंवा सारख्या वापरणे खराब झालेल्या नोटांना रिजर्व बँक परत घेते
No comments:
Post a Comment