Pages
- गणित कार्यपुस्तिका-इयत्ता १ ली
- विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पुस्तके
- वर्नानात्म्क नोंदी आकारिक मूल्यमापन
- तोंडीकाम इयत्ता १ली ते ८ वी प्रथम सत्र
- मराठी विषयाचे संपूर्ण व्याकरण
- १०१ अनमोल विचार
- इयत्ता ५वी ते ८ वी शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका
- भारतरत्न
- भारतीय शास्त्रज्ञाचे शोध/पुरस्कार/कार्य
- पहिली/दुसरीचे ज्ञानरचनावादी उपक्रम
- जागतिक दिवस
- महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिवस
- सरकारी कर्मचारी सुरक्षा विषयक कायदे
- शिक्षण हक्क कायदा 2009 कलमे
- विद्यार्थी लाभाच्या योजना
- १ ली ते ८ वी प्रकल्प यादी
- मुख्याध्यापकाची कामे
- शालेय अभिलेखे
- सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदी
- दिवाळी अभ्यास इयत्ता १ ली
- गणितातील महत्त्वाची सूत्रे
- सर्व जागतिक दिवस
- जगातील सर्व स्टेडियम
Monday, 1 January 2018
Friday, 10 November 2017
मास्तरकी एक फरफट
नौकरी नव्हे 'चाकरीच.!' शंकाच न उरली !
तोंड दाबून बुक्क्यांचा मार... पार जिरली !
स्वप्ने 'भारत' घडवण्याची हवेतच विरली.!
शेतच चोरीला गेली, जिथे मी संस्कार पेरली !
कुठे हरवलाय 'माझा' विद्यार्थी ....
पण होय..... मी लाभार्थी !!
खिशातून करून हजारोंचा चुराडा !
करतोय मोकळा मी 'शिष्यवृत्तींचा' गराडा !
*सर्वांना शिक्षा* देऊन अखेर शाळेचा खुराडा!
रात्रंदिस संगणक पण पोर्टलच्या पोटात मुरडा !
माझाच कापूर जाळून 'माझीच' आरती ....
पण होय ..... मी लाभार्थी !!
भाजीपाला, सरपण घेऊन शाळेवर जातो !
'ऑनलाईन' माहिती भरायला *रेंज* पाहतो !
नोंदवहीत ग्रॅम - ग्रॅम चा हिशोब ठेवतो !
सगळी 'सर्कस' करून फक्त शिव्याच खातो !
'चव' चांगली तरी 'मीच' ठरतो स्वार्थी....
पण होय ..... मी लाभार्थी !!
'संचमान्यता' समजेना 'स्टाफ' उमजेना !
'विद्यार्थी' पोर्टल चा तर गुंताच सुटेना !
रात्र संगणकासमोर गेली दिवसा पण प्रश्न मिटेना !
बायको बोलते, 'माझ्या प्रियाला प्रीत कळेना !
'लाचारी' शब्दाचा 'मी' समानार्थी ....
पण होय ..... मी लाभार्थी !!
'ज्ञानरचनावाद' तुमचा मीच यशस्वी केला !
'प्रगत शाळांचा' पाया मीच रचला !
'शाळा सिद्धी' पण दणक्यात साजरा झाला !
कदाचित हाच 'उतावीळपणा' मलाच भोवला !
म्हणूनच हा २७/२ 'मलाच' विरुद्धार्थी ....
पण होय मी ..... लाभार्थी !!
'निकाल' काहीही लागो माणसे दुरावली !
माझेच प्रतिबिंबे मला सोडून गेली !
पाण्यात काठी मारण्याची तुम्ही चूक केली !
आज जरी उजाड माझी घरटी झाली !
माझ्याच घरी जरी 'मी' आज शरणार्थी !
पण होय मी ..... लाभार्थी !!
सोसण्या जुलूम मी थोडी छाती मोठीच केली !
तुमची ५६ तर माझी ५८ इंच फुगली !
संघर्षाची बीजे तुम्ही आमच्या मनात रोवली !
इतिहास उलटून पहा.. 'साहेब'.....
'सुलतानी' आम्हीच लोप पावली !
साक्षीला चंद्र, तारे अन धरती ....
पण होय मी ..... लाभार्थी !!
--- *शरदचंद्र शहापुरकर*
*८४८४०३११११*

Thursday, 12 October 2017
पण का Why ...? आवश्य वाचा.
*⛔ पण का - Why? ⛔*
❓
_➖आम्हाला बालवाडी पासुन सुरस चमत्कारांनी ठासुन भरलेले रामायण, महाभारत कुरआन, बायबल शिकवले जाते._
_➖जपान मध्ये बालवाडीच्या मुलांना why (का ? ) नावाचे पुस्तक शिकवीले जाते व मोठा झाल्यावर कुठल्याही घटनेचे कारण शोधण्यासाठी दिलेल्या उत्तराला Five times why विचारल्यास त्याचे खरे कारण मिळते असा तो सिद्धांत ! त्यामुळे जपान मध्ये टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आणि भारतात धार्मिक कर्मकांड आणि अंधश्रध्दांमुळे आमच्या मेंदूला कुलूप घातले गेलेलं आहे._
_➖म्हणूनच १०० किलो वजन असणारा, ६ फुट उंच असणारा, एका बुक्कीत नारळ फोडू शकणारा मनुष्य , हळद-कुंकू लावालेलं छोटसं लिंबू रस्त्यात दिसलं की घाबरतो._
_➖आम्हाला why हा प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही किंवा ती चौकस बुध्दी पद्धतशीरपणे खुरटवण्यात आली आहे. आम्ही गप्प बसा, प्रश्न विचारू नका, या संस्कृतीत वाढलो आहोत आणि आमच्या मुलाबाळांना वाढवत आहोत._
_➖पण हे बदलायला हवे. मुलांनी why म्हणायला शिकायाला हवे. म्हणून आम्हाला धर्मांधतेवर टिका करावी लागते. त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांच्या वाटेत परंपरेच्या, धर्माच्या, जातीच्या, पोटजातीच्या आणि वर्चस्ववादी वृत्तीच्या घातक मानसिकतेचे काटे अंथरण्याचे काम युगानुयुगांपासून कोण करीत आहे हे दाखवून देण्याचे प्रामाणिक काम (लोकांच्या दृष्टीने अप्रिय काम) करावे लागते._
_➖इतिहासात व वर्तमानात हे बदण्याचे प्रयत्न सर्व जाती धर्मातील संतांनी महंतांनी, नव धर्म निर्मात्यांनी प्रयत्न केले परंतु समाज कंटकांनी त्यांच्या ही संप्रदायात घुसखोरी करुन शेवटी त्यांचे लिखाण कर्मकांडातुन अंधश्रद्धेकडेच नेऊन ठेवले ! खर्यांना जलसमाधी दिली नाहीतर गाडून समाधी घेतलेली दाखवून त्यांना डायरेक्ट स्वर्गातुन विमानच नेयायाला आले !!_
_➖भारतातील प्रत्येक माणूस हा अंधश्रद्धेने निर्माण झालेल्या (केलेल्या) अज्ञानामुळे अर्धा मेलेला आहे ! अज्ञान रुपी अंधाराच्या सनातनी अग्रदूतांना हेच कदाचित पटत नसावे म्हणून पराकोटीचा तिरस्कार या व्यक्ती म्हणून करत असतात आणि त्यासाठी त्या कुठल्याही थराला जावून संस्कारहीन पातळी गाठतात._
_➖लहानपणापासून आपल्या समाजात परंपरेचे, अंधश्रध्देचे, देवाधर्माचे इतके डोस पाजले जातात की, ती व्यक्ती मोठी झाल्यावर त्यांच्या पूर्णपणे आहारी गेलेली असते. एखाद्या अमली पदार्थासारखा हा विषय त्यांच्या मनात आणि शरीरात भिनला जातो. ते स्वत: काही विचारच करू शकत नाहीत कारण त्यांना ह्या गोष्टीची भोंदूबाबा, बूवा, साधू, महाराज तसेच धर्मवेडे यांनी इतकी भिती घातलेली असते की, इकडे आड तिकडे विहीर, धरलं तर चावते सोडलं तर पळते अशी बिचाऱ्यांची अवस्था होते. अशा परीस्थितीतून तुमच्या आमच्या सारखा विचारांनी त्या बुरसटलेल्या संस्कारांवर मात करून एखादाच बाहेर पडू शकतो._
_➖पण बऱ्याच लोकांच्या बाबतीत विचार करण्याची क्षमता प्राप्त झाल्यावरही त्यांना धर्माच्या कचाट्यातून बाहेर पडणे दुरापास्त होते; एवढे brain washing त्या अजाणतेपणी झालेले असते. म्हणून मूल वाढवतांना त्याला जरी सर्व धर्मांची माहीती दिली, तरी त्याच्यावर आपल्याच धर्माचे रोपण करण्याऐवजी सज्ञान होईपर्यन्त विचार करायला वाव द्यायाला हवा._
_➖आणि तदनंतर त्यालाच ठरवू द्यावे कोणत्या धर्माचा स्विकार करायचा वा निधर्मी राहायचे ते. ह्यालाच व्यक्ती स्वातंत्र्य देणे मानतात. हेच खरे पालकत्व असे मला वाटते !_
_➖आजचे जगातील अर्ध्याहून जास्त शोध हे भारतवर्षात हजारो वर्षापूर्वीच लागलेले आहेत अशी आपण शेखी मिरावतो ! हे खरेही असेल तरीही आज आपण टेक्नाँलाँजीसाठी जगावर अवलंबून का ? या Why चे उत्तर हे यातच दडले आहे मधल्या काळात ९८ % भारतीयांना शिक्षणाचा अधिकार न ठेवल्यामुळे त्या शोधांचा विकास कसा हौईल ??? त्याच्या झळा आता आपण सर्वच भोगत आहोत !

Subscribe to:
Posts (Atom)
माझी शाळा फोटो अल्बम
...
| *YOUR LOCATION* |
|---|
| !doctype> |
|---|