शैक्षणिक माहितीचा स्रोत
सुजीत फलके
सहशिक्षक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटनांद्रावाडी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद

��!...आपले स्वागत आहे शैक्षणिक माहितीच्या स्रोतरूपी माझ्या या ब्लॉगवर...!��


W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools
W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools

Pages

Thursday, 12 October 2017

पण का Why ...? आवश्य वाचा.

*⛔ पण का - Why? ⛔*

                 ❓

_➖आम्हाला बालवाडी पासुन सुरस चमत्कारांनी ठासुन भरलेले रामायण, महाभारत कुरआन, बायबल शिकवले जाते._

_➖जपान मध्ये बालवाडीच्या मुलांना why (का ? ) नावाचे पुस्तक शिकवीले जाते व मोठा झाल्यावर कुठल्याही घटनेचे कारण शोधण्यासाठी दिलेल्या उत्तराला Five times why विचारल्यास त्याचे खरे कारण मिळते असा तो सिद्धांत !  त्यामुळे जपान मध्ये टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आणि भारतात धार्मिक कर्मकांड आणि अंधश्रध्दांमुळे आमच्या मेंदूला कुलूप घातले गेलेलं आहे._

_➖म्हणूनच १०० किलो वजन असणारा, ६ फुट उंच असणारा, एका बुक्कीत नारळ फोडू शकणारा मनुष्य , हळद-कुंकू लावालेलं छोटसं लिंबू रस्त्यात दिसलं की घाबरतो._

_➖आम्हाला why हा प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही किंवा ती चौकस बुध्दी पद्धतशीरपणे खुरटवण्यात आली आहे. आम्ही गप्प बसा, प्रश्न विचारू नका, या संस्कृतीत वाढलो आहोत आणि आमच्या मुलाबाळांना वाढवत आहोत._

_➖पण हे बदलायला हवे. मुलांनी why म्हणायला शिकायाला हवे. म्हणून आम्हाला धर्मांधतेवर टिका करावी लागते. त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांच्या वाटेत परंपरेच्या, धर्माच्या, जातीच्या, पोटजातीच्या आणि वर्चस्ववादी वृत्तीच्या घातक मानसिकतेचे काटे अंथरण्याचे काम युगानुयुगांपासून कोण करीत आहे हे दाखवून देण्याचे प्रामाणिक काम (लोकांच्या दृष्टीने अप्रिय काम) करावे लागते._

_➖इतिहासात व वर्तमानात हे बदण्याचे प्रयत्न सर्व जाती धर्मातील संतांनी महंतांनी, नव धर्म निर्मात्यांनी प्रयत्न केले परंतु समाज कंटकांनी त्यांच्या ही संप्रदायात घुसखोरी करुन शेवटी त्यांचे लिखाण कर्मकांडातुन अंधश्रद्धेकडेच नेऊन ठेवले ! खर्यांना जलसमाधी दिली नाहीतर गाडून समाधी घेतलेली दाखवून त्यांना डायरेक्ट स्वर्गातुन विमानच नेयायाला आले !!_

_➖भारतातील प्रत्येक माणूस हा अंधश्रद्धेने निर्माण झालेल्या (केलेल्या) अज्ञानामुळे अर्धा मेलेला आहे ! अज्ञान रुपी अंधाराच्या सनातनी अग्रदूतांना हेच कदाचित  पटत नसावे म्हणून पराकोटीचा तिरस्कार या व्यक्ती म्हणून करत असतात आणि त्यासाठी त्या कुठल्याही थराला जावून संस्कारहीन पातळी गाठतात._

_➖लहानपणापासून आपल्या समाजात परंपरेचे, अंधश्रध्देचे, देवाधर्माचे इतके डोस पाजले जातात की, ती व्यक्ती मोठी झाल्यावर त्यांच्या पूर्णपणे आहारी गेलेली असते. एखाद्या अमली पदार्थासारखा हा विषय त्यांच्या मनात आणि शरीरात भिनला जातो. ते स्वत: काही विचारच करू शकत नाहीत कारण त्यांना ह्या गोष्टीची भोंदूबाबा, बूवा, साधू, महाराज तसेच धर्मवेडे यांनी इतकी भिती घातलेली असते की, इकडे आड तिकडे विहीर, धरलं तर चावते सोडलं तर पळते अशी बिचाऱ्यांची अवस्था होते. अशा परीस्थितीतून तुमच्या आमच्या सारखा विचारांनी त्या बुरसटलेल्या संस्कारांवर मात करून एखादाच बाहेर पडू शकतो._

_➖पण बऱ्याच लोकांच्या बाबतीत विचार करण्याची क्षमता प्राप्त झाल्यावरही त्यांना धर्माच्या कचाट्यातून बाहेर पडणे दुरापास्त होते; एवढे brain washing त्या अजाणतेपणी झालेले असते. म्हणून मूल वाढवतांना त्याला जरी सर्व धर्मांची माहीती दिली, तरी त्याच्यावर आपल्याच धर्माचे रोपण करण्याऐवजी सज्ञान होईपर्यन्त विचार करायला वाव द्यायाला हवा._

_➖आणि तदनंतर त्यालाच ठरवू द्यावे कोणत्या धर्माचा स्विकार करायचा वा निधर्मी राहायचे ते. ह्यालाच व्यक्ती स्वातंत्र्य देणे मानतात. हेच खरे पालकत्व असे मला वाटते !_

_➖आजचे जगातील अर्ध्याहून जास्त शोध हे भारतवर्षात हजारो वर्षापूर्वीच लागलेले आहेत अशी आपण शेखी मिरावतो ! हे खरेही असेल तरीही आज आपण टेक्नाँलाँजीसाठी जगावर अवलंबून का ? या Why चे उत्तर हे यातच दडले आहे मधल्या काळात ९८ % भारतीयांना शिक्षणाचा अधिकार न ठेवल्यामुळे त्या शोधांचा विकास कसा हौईल ??? त्याच्या झळा आता आपण सर्वच भोगत आहोत !

No comments:

Post a Comment

माझी शाळा फोटो अल्बम

...
DOWNLOAD BOOKS FOR FREE

शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन

परिवर्तनशील शिक्षण

दिवास्वप्न

तोत्तोचान

टीचर

मुले नापास कां होतात?

सहज शिक्षणाची प्रयोगशाळा

पहिला अध्यापक

लिंगभाव समजून घेताना

प्रिय बाई

धोका शाळा

शिक्षणाचे जादुभरे बेट

समरहिल

मुले खेळतात जग मोठं करतात

कोसबाडच्या टेकडीवरून

*YOUR LOCATION*
WHAT DAY & DATE IS TODAY ?