शैक्षणिक माहितीचा स्रोत
सुजीत फलके
सहशिक्षक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटनांद्रावाडी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद

��!...आपले स्वागत आहे शैक्षणिक माहितीच्या स्रोतरूपी माझ्या या ब्लॉगवर...!��


W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools
W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools

Pages

Friday, 10 November 2017

मास्तरकी एक फरफट

नौकरी नव्हे 'चाकरीच.!' शंकाच न उरली !
तोंड दाबून बुक्क्यांचा मार... पार जिरली !
स्वप्ने 'भारत' घडवण्याची हवेतच विरली.!
शेतच चोरीला गेली, जिथे मी संस्कार पेरली !
कुठे हरवलाय 'माझा' विद्यार्थी ....
पण होय..... मी लाभार्थी !!

खिशातून करून हजारोंचा चुराडा !
करतोय मोकळा मी 'शिष्यवृत्तींचा' गराडा !
*सर्वांना शिक्षा* देऊन अखेर शाळेचा खुराडा!
रात्रंदिस संगणक पण पोर्टलच्या पोटात मुरडा !
माझाच कापूर जाळून 'माझीच' आरती ....
पण होय ..... मी लाभार्थी !!

भाजीपाला, सरपण घेऊन शाळेवर जातो !
'ऑनलाईन' माहिती भरायला *रेंज* पाहतो !
नोंदवहीत ग्रॅम - ग्रॅम चा हिशोब ठेवतो !
सगळी 'सर्कस' करून फक्त शिव्याच खातो !
'चव' चांगली तरी 'मीच' ठरतो स्वार्थी....
पण होय ..... मी लाभार्थी !!

'संचमान्यता' समजेना 'स्टाफ' उमजेना !
'विद्यार्थी' पोर्टल चा तर गुंताच सुटेना !
रात्र संगणकासमोर गेली दिवसा पण प्रश्न मिटेना !
बायको बोलते, 'माझ्या प्रियाला प्रीत कळेना !
'लाचारी' शब्दाचा 'मी' समानार्थी ....
पण होय ..... मी लाभार्थी !!

'ज्ञानरचनावाद' तुमचा मीच यशस्वी केला !
'प्रगत शाळांचा' पाया मीच रचला !
'शाळा सिद्धी' पण दणक्यात साजरा झाला !
कदाचित हाच 'उतावीळपणा' मलाच भोवला !
म्हणूनच हा २७/२ 'मलाच' विरुद्धार्थी ....
पण होय मी ..... लाभार्थी !!

'निकाल' काहीही लागो माणसे दुरावली !
माझेच प्रतिबिंबे मला सोडून गेली !
पाण्यात काठी मारण्याची तुम्ही चूक केली !
आज जरी उजाड माझी घरटी झाली !
माझ्याच घरी जरी 'मी' आज शरणार्थी !
पण होय मी ..... लाभार्थी !!

सोसण्या जुलूम मी थोडी छाती मोठीच केली !
तुमची ५६ तर माझी ५८ इंच फुगली !
संघर्षाची बीजे तुम्ही आमच्या मनात रोवली !
इतिहास उलटून पहा.. 'साहेब'.....
'सुलतानी' आम्हीच लोप पावली !
साक्षीला चंद्र, तारे अन धरती ....
पण होय मी ..... लाभार्थी !!

                --- *शरदचंद्र शहापुरकर*
                    *८४८४०३११११*

No comments:

Post a Comment

माझी शाळा फोटो अल्बम

...
DOWNLOAD BOOKS FOR FREE

शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन

परिवर्तनशील शिक्षण

दिवास्वप्न

तोत्तोचान

टीचर

मुले नापास कां होतात?

सहज शिक्षणाची प्रयोगशाळा

पहिला अध्यापक

लिंगभाव समजून घेताना

प्रिय बाई

धोका शाळा

शिक्षणाचे जादुभरे बेट

समरहिल

मुले खेळतात जग मोठं करतात

कोसबाडच्या टेकडीवरून

*YOUR LOCATION*
WHAT DAY & DATE IS TODAY ?