शैक्षणिक माहितीचा स्रोत
सुजीत फलके
सहशिक्षक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटनांद्रावाडी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद

��!...आपले स्वागत आहे शैक्षणिक माहितीच्या स्रोतरूपी माझ्या या ब्लॉगवर...!��


W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools
W3SchoolsW3SchoolsW3SchoolsW3Schools

Pages

Sunday, 1 October 2017

शिक्षणाचा बाजार /तेजीत फार / सोसवेना भार/ करावे काय/

शिक्षणाचा बाजार /तेजीत फार /

सोसवेना भार/ करावे काय/


स्वामी विवेकानंद म्हणतात अशिक्षित मुल म्हणजे पंख नसलेला पक्षी.स्वप्न तर सोडाच साधा उभारी सुध्दा घेऊ शकत नाही शिक्षणाचे महत्त्व प्रत्येक शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या लेखणीतून स्पष्ट केले आहे महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, सर्वपल्ली राधाकृष्णन या सर्वांनी शिक्षणाच्या प्रवाहाबाबत यथार्थ निदेशन केले आहे. भारतीय शिक्षण हे मुळातच संस्कृती, देशभक्ती आणि इतिहास यावर उभे राहताना दिसते.शिक्षणाचे आद्य प्रवर्तक फुले दांपत्य शिक्षणाची गरज ओळखून स्वतःचे जीवन अशा कार्यात वाहून घेते महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख अशी व्यक्ती वल्ली याच शिक्षणासाठी अहोरात्र झटली.  याचे मूळ कारण हेच कि शिक्षणाला पर्याय नाही प्रगती, विकास ,उत्कर्ष विना शिक्षण नाहीच नाही.

      महाराष्ट्रातील संतपरंपरा सुध्दा शिक्षणाची महती सांगताना व तिचा पाया रचताना दिसतात शिक्षण मानवाला पशुत्वा कडून मनुष्यत्वाकडे नेणारे, अविवेकाकडून विवेकाकडे नेणारे , जीवनाचे खरे दर्शन घडवणारे ते एक तेजोवलय आहे जो या वलयात स्वतःला झोकून देतो तो शिक्षणरूपी ज्ञान सागराचा पाईक होतो.  हेही सत्य आहे शिक्षणाने मस्तके सुधारतात आणि हीच सुधारलेली मस्तके भावी देशाचे भवितव्य घडवत असतात. प्रत्येक समाजाच्या उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग शिक्षणच आहे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या जीवनचरित्रातून ठणकावून सांगताना दिसतात.

      शिक्षणाला नाही धर्म असतो ना पंथ संप्रदाय असतो. कोणी या, शिक्षणात स्वतःला समृद्ध करा आणि अवघे विश्व अभ्यासा आपल्या या वाहत्या गंगेत पवित्र होऊन जा.हे पवित्र असे हे शिक्षण आहे .काळाबरोबर जगही बदलते म्हणतात त्याप्रमाणे प्रचलित शिक्षणपद्धती कालबाह्य झाली आणि नविन ज्ञानाच्या  कक्षा रुंदावत शिक्षण रवी आकाशी झळकला यातून प्रवाह बदलत गेले. शिक्षणाची  प्रकाशज्वोत फोफावली. शिक्षणात उत्कर्ष हा एकच ध्यास  भारताने घेतला आणि कोठारी आयोगाने केलेली सुरुवात सर्वशिक्षा अभियाना पर्यंत येऊन पोहोचली आहे.

        आज  जे शिक्षण प्रवाह रुजत  आहेत त्यात इतिहासाच्या पाऊलखुणा पुढे आल्या आहे हे नाकारून चालणार नाही .अनेक शिक्षणतज्ञांनी मोलाचे योगदान दिले आहे. शिक्षण हे राष्ट्रास पूरक  आणि  समाजास पोषक  आसाव हे शिक्षण सूत्र होतं आजही शिक्षण हे राष्ट्रस पूरक आहे परंतु या शिक्षणा मुळे  समाज समृद्ध होतोय का त्याचे परिपूर्ण पोषण होतोय का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व शिक्षण वैयक्तिक फायद्याच्याच  विचार करताना दिसते. जीवघेणी स्पर्धा, त्यावर शिक्षण अभ्यासक्रमाचा भाग ,नानाविध प्रकारची शिक्षण क्षेत्र यामुळे नवोदित शिकणारा प्रथम दडपला जातो आहे. दहावी-बारावी तर प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी सत्त्वपरीक्षाच असते जणू काही जीवन-मरणाचा प्रश्न या परीक्षेतून तुम्ही सुटला तर तुमच्या अपेक्षा पल्लवीत होतात आणि पुढे नवनवीन आव्हाने दिसतात .पण तुम्ही झेलायला तयार असतात जर तुम्ही मागे पडलात तर काळ तुम्हाला मागे ढकलतो. जीवन वेगळेच रूप धारण करत मन रडत कढत शिक्षण, लहानमोठी नौकरी ,संसार यात जीवन पिचून जाते .यामुळे आईवडिलांसाठी सुद्धा दोन वर्षे बहुमोल असतात आणि यांवर त्यांच्या मुलांचे भवितव्य असते त्यात मोठी मोठी महाविद्यालये, त्यांचे क्लासेस आणि इतर खर्च यामुळे पालकवर्ग अक्षरशः मेटाकुटीला येतो परंतु यंत्रणा आहे या नावाने सर्व काही पुढे ढकलले.जाते.

        प्राथमिक शिक्षणात सुध्दा यापेक्षा वेगळे ते काय असणार ग्रामीण भाग सरकारी शाळांवर अवलंबून; शहरी भाग खाजगी शाळांवर  अवलंबून  दिसून येतो.जो एक मोठा व्यक्ति शाळा सुरू करताना भौतिक सुविधा प्रथम उभारतो. सरकारी शाळा  तसं करताना दिसत नाही .ग्रामीण भागात काही ठिकाणी पर्याय म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत घालतात परंतु हेही मान्य करायला हवे की 2010 पासून या सरकारी शाळेत अमुलाग्र बदल झालेला आहे कारण स्पष्ट आहे जो आपल्या अस्तित्वाचा प्रश्न तयार होतो तेव्हा हात आपोआप कामाला लागतात. या शाळांमध्ये हे झाले खाजगी संस्थांचा दिखाऊपणा उघड करण्यासाठी सरकारी शिक्षक पुढारलेली लर्निंग शाळा ,आदर्श शाळा, संगणीकृत शाळा .आय एस ओ शाळा अशा काही नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन हे सरकारी बांधव पुढे येऊन काम करू लागले  त्यामळे सरकारी शाळांचा दर्जा नक्कीच सुधारलेला आपणाला दिसतो.  सेमी इंग्रजी, इंग्रजी वर्ग वाढ अशा सरकारी योजनांमुळे की यांना एक प्रकारे मदतच झाली आहे. समाजानेही या शाळांच्या व्यवस्थापनासाठी मोलाचा सहभाग दिला आहे उदाहरण आहे धुळे-नंदुरबार जिल्ह्यात कोटीच्या  वरही लोकसहभागाची नोंद आहे तरीही शिक्षणाचा घोडेबाजार थांबायला तयार नाही खासगी शाळांचा दुटप्पीपणा कोणीही पाहू शकतो.
 आजचे शिक्षण म्हणजे नुसता बाजार आहे. कोणीही यावं शाळा सुरू कराव्यात ,पालक अन पाल्याचीही पिळवणूक करावी असे वातावरण आहे. धनाढ्य शाळा कढतात कमी पगारावर शिक्षक नेमतात विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी वसूल करतात आणि आपली कुबेराची रास जमवत राहतात यांत मारतात मध्यमवर्गीय पालक. शाळा,  कॉलेजेस, विद्यालये सर्व आमदार खासदारांची, भरमसाठ फी, डोनेशन असतांत तेथें पैशांचा बाजार. फक्त पैसा आणि पैसाच कमवतात तेथे. काही राजकारणी शाळांतून करतही असतील चांगले काम परंतु ते बोटावर मोजण्याइतकीच असतात. शिक्षक पालक यांचा नुसता छळवाद मांडला जातो आणि हे सर्व गरज म्हणून सर्व काही सहन करत असतात .सरकारी शाळा कॉलेजेस मध्ये भ्रष्टाचाराच जास्त आहे कोण कुठे पैसे कमवत असेल याचा भरवसा नाही .मुलांची कपडे, शालेय पोषण आहार ,शिष्यवृत्ती अनुदाने हे सर्रास लाटले जाते. नीतीच्या गोष्टी सांगणारे शिक्षक, अधिकारी हा सर्व खर्च लंपास करतात आणि ही यंत्रणाच खराब आहे असा आरोप लावून मोकळे होतात. अत्याचाराच्या सर्व सीमा ओलांडून हे सर्वकाही अविरतपणे चालूच असते हे सर्व अधिकारी वर्ग बांधकामात पैसा कमवतात,कपडे ,धान्यादी माल, शिक्षक नेमणूक ,शिक्षक बदली ,शाळा मान्यता अशा कितीतरी कामात ही सिस्टिम माया जमवते. कुठे  जातो हा पैसा माहिती नाही आणि तरी सर्व काही सर्व ठिकाणी आलबेल आहे असे वाटते. आपल्या या शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा पाढा वाचला तर काहींच्या पायाखालची जमीन सरकली जाईल परंतु चालतय निभावून जातय कोणी बोलायला नको त्यांना कोणी विचारायला नको. आता तर दिवस इतके वाईट आहेतकी माहितीचा अधिकार मागनारे पैसे घेतात आणि त्याचाच भाग होउन जातात आणि विशेष म्हणजे छळला गेलेले कधी काही बोलणार नाही कधी यासाठी आवाज उठवणार नाही फक्त पहात राहणार "ठेविले अनंते तैसेची रहावे "याप्रमाणे सर्व काही राजरोसपणे चालू आहे.तरी अपेक्षा देश प्रगती करत आहे हे कुठेतरी थांबायला हवे याचा अर्थ समजून विचार करायला हवा शिक्षण स्वाभिमानासाठी असतानाच शिक्षण माणसाला घडवतं,शिक्षण उत्कर्षाचे साधन हीच आपल्या पुढील पिढ्यांसाठी एक महत्त्वाची बाब आहे हे आपण जानले पाहिजे.

लेखक - श्री.सुजित फलके
             सहशिक्षक

No comments:

Post a Comment

माझी शाळा फोटो अल्बम

...
DOWNLOAD BOOKS FOR FREE

शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन

परिवर्तनशील शिक्षण

दिवास्वप्न

तोत्तोचान

टीचर

मुले नापास कां होतात?

सहज शिक्षणाची प्रयोगशाळा

पहिला अध्यापक

लिंगभाव समजून घेताना

प्रिय बाई

धोका शाळा

शिक्षणाचे जादुभरे बेट

समरहिल

मुले खेळतात जग मोठं करतात

कोसबाडच्या टेकडीवरून

*YOUR LOCATION*
WHAT DAY & DATE IS TODAY ?