शिक्षकदिन माझे मनोगत
५ सप्टेंबर शिक्षक दिन ,देशाच्या सेवेतील सर्व गुरुजनाना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शिक्षक हा व्यावसाय नाही, पेशा नाही ,किंवा अर्थार्जनाचे साधन सुध्दा नाही हे एक व्रत आहे हे एक कर्तव्य आहे ही एक देशाप्रती निष्टा आहे. ज्या प्रमाणे आमचे जवान सीमेवर कर्तव्य बजावतात त्याप्रमाणेच आहे फरक येवढा कि ते शत्रू पासुन सरक्षंण करतात आणि शिक्षक देशाच्या पिढ्यांचे मार्गदर्शन करून कर्तृत्ववान नागरिक घाडवतात कि जे देश घडवण्यासाठी मदतगार होतील.देशाच्या भविष्यासाठी शिक्षक जबाबदार असतात हे मान्य करायला हरकत नाही.जेव्हा एखादा समाज शिक्षणा विषयी अनासक्त असतो तेव्हा कुठे हे गुरुजन त्या समाजाच्या विकासासाठी धावून येतात.प्रत्येक व्यक्ती परत्वे कहिना काही क्षमता असते हे सर्वांना माहिती असते पण त्या क्षमतेचा योग्य वापर करून त्याचा विकास फक्त एक योग्य गुरूच करु शकतो. आज मानव समाज एका नैराश्य जनक गर्तेत आहे तिथे त्याच्या समोर अंधकार आणि भिती सोडुन काहिच दिसत नाही . मग आपल्या विकासाबाबत काय विचार करेल ?
आपण पाहतो लहानग्या पासून ते जेष्ठतम व्यक्ती सुद्धा अविवेकी बुद्धिने आत्महत्या करतो.कारण काही असो पैसा,मान,अपमान,शिक्षण,व्यावसाय असा प्रत्येक गोष्टीत जो माती खातो तो लगेच जीवन संपवतो. ज्या शिक्षकानी त्याला कनखर हो म्हणून शिकवले. प्रयत्न हाच परमेश्वर हे शिकवले ते त्याच्या जिवनातुन कधीच लुप्त होतय हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही .शिक्षण अस असाव ते जिवनाचे रहस्य समजावून सांगेन जीवन कस सार्थक करता येइल हे सांगेन आणि विषय राहिला हे समजून घ्यायचा तर आपला गुरु सोडून कोणी मुक्तीदाता नाही. गुरू सर्व काही शिष्य कल्याणासाठी करतो हे तितकेच खरे. शिष्याचा भवसागर पार करण्यात अनेक गुरु त्याला मदत करतात.जिवणात येणाऱ्या प्रत्येक गुरूचे हे आद्य कर्तव्य आहे कि आपला शिष्य सामाजिक,मानसिक ,शैक्षणिक दृष्टीने कसा सक्षम होईल याकडे लक्ष द्यावे.तो जिवनातील प्रत्येक प्रसंगाला कसा ध्येर्याने सामोरे जाईल यासाठी त्याला खऱ्या अर्थाने शिकवले पाहिजे.न्याय, समता,बंधूभाव,राष्ट्रभक्ती या बरोबर च वागणूक, सय्यम, विवेकी विचार,चिंतन, आचरण , याकडे देखील समान भावनेने पहिले पाहिजे तेव्हा गुरु शिष्य परंपरा खऱ्या आर्थने जपली जाईल.
आजकाल शिक्षणाचे होणारे बाजारीकरण अनुकरण याची किंमत पुढील पिढ्याना सामाजिक ऱ्हासतुन मोजावी लागेल यात शंका नाही.आज कोणीही आपल्या घरच्या शिक्षण संस्था स्थापून विद्यादान देत आहे आणि बदल्यात पैसा कमवत आहे. आणि विशेष म्हणजे सरकार याला विरोध करते कि समर्थन करते हा कळीचा मुद्दा आहे. पण हो यातून पुढील पिढी कशी शिक्षित असेल हे समजु शकते.शिक्षित पेक्षा सुसंस्कारित शिक्षित पिढी भावी काळात हवी कि जी ही संस्था दर्जेदार पणे नाही देउ शकत. खाजगीकरण,दिखाऊपण,भपकेपणा, इतरांपेक्षा वेगळेपणा जपण्याच्या नादात ह्या शिक्षाणापासुन विलग होत आहे आणि स्वतः वस्तू निर्माते बनत आहेत हे भविष्यात अवघड होउन बसणार आहे.इंग्रजी माध्यम ही समाजाला लागलेले व्यसन आहे त्याचा मुलगा त्या शाळेत म्हणून माझा पण तो काय कविता म्हणतो इंग्रजीत मस्त! काय लिहितो इंग्रजी छान आणि याशाळेतले भपके पणा दाखवून या पालकाना आपल्या कडे आकर्षित करतात. मग त्या मुलाचे हाल सुरु पाठांतर, घोकमपट्टी आणि मान मोडेल इतका आभ्यास कशी शिकणार ह्या पिढ्या पुढे गेल्यावर कोणत्याही माध्यमातून तो मुलगा पुढे जात नाही यात दोष द्यावा तरी कोणाला? खरा गुरु शिष्यांसाठी जिवाचे रान करुन अध्ययन अनुभव देत असतो. विद्यार्थ्यांची समर्पक भावना येथे खुप मह्त्वपूर्ण आहे.
आजकाल आमचे गुरुजन इतर कामात व्यस्त असतात.शासकीय कामे त्याचे शिकवण्याची क्षमता जवळ जवळ नष्ट करत आहेत. बदल्या, ओनलाइन कामे, कागदी घोडे आणि विविध योजना यामुळे त्यांची त्रेढात्रिपित होते आहे या घटक समाजला जर स्थैर्य नसेल तर अपेक्षित परिणाम साधने अवघड होइल.शिक्षक मानसिकता शिक्षण क्षेत्रात खूप महत्त्वाची आहे जर शिक्षक सकारात्मक असेल तर तो दगडावर ही हिरवळ उगवु शकतो. प्रत्येक मुलाला तो इच्छित पातळीवर नेउ शकतो.परंतु जर कोणत्याही करणाने त्याच्या भूमिकेत फरक पडला तर त्याचा परिणाम त्या विध्यार्थीवर होतो. गावातील लोक , आधिकारी, शासन यानी नेहमी ह्या घटकाला नेहमी मार्गदर्शन करणे प्रोत्साहन देने गरजेचे आहे जर याना त्या कारणाने लोक , पदाधिकारी, अधिकारी त्यांना त्रास देत असेल तर विकास तर सोडा ती शाळा घसरतच चालेल आणि गरजेपेक्षा जास्त बाहेरील हस्तक्षेप शिक्षकांची मानसिकता बदलू शकतो. त्यामुळे गावाने शाळेच्या विकासासाठी हातभार लावावा.मार्गदर्शन करावे.शासन देखील प्रत्येक वेळस शिक्षकांकडुन माफक आपेक्षा ठेवते. आपल्या इतर योजना राबविण्यात शिक्षकाना राबवून घेते असे कुठेही दुसऱ्या देशात तुम्हाला दिसणार नाही शिक्षण जर प्राथमिक गरजेत असेल तर शिक्षक त्याबाबतीत निर्णय घेण्यास मोकळे हवेत.
श्री.सुजित फलके
No comments:
Post a Comment